विद्याभारती कन्या विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय गडचिरोली येथे शिक्षणमहर्षी श्रद्धेय गोविंदराव मुनघाटे यांंची जयंती तथा राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

30

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १२ जानेवारी २०२३ : दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली द्वारा संचालित स्थानिक विद्याभारती कन्या विद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय शिक्षणमहर्षी श्रद्धेय गोविंदराव मुनघाटे यांंची जयंती तथा राष्ट्रमाता जिजाऊ व युवानेते स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्या सौ. वंदनाताई मुनघाटे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. गोपाल मुनघाटे व श्री. संजय गद्देवार, चंदा चौधरी उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले व श्रद्धेय गो. ना. मुनघाटे, राष्ट्रमाता जिजाऊ व युवानेते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन तथा माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून गो. ना. मुनघाटे यांनी रचलेल्या ‘झाड फुलांचे लावावे’ या कवितासंग्रहातील कवितांचे विद्यार्थिनींनी सुमधुर आवाजात गायन केले. तसेच साहेबांनी रचलेल्या गडचिरोली गौरव गीतांचे गायन देवला बानबले मॅडम यांनी केले.

याप्रसंगी प्रमुख अतिथी गद्देवार तसेच मुनघाटे यांनी गो. ना. मुनघाटे साहेबांच्या शैक्षणिक तथा सांस्कृतिक कार्याचा आढावा घेत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. तसेच मॉं जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रागीनी मेश्राम व प्रतिक्षा झाडे वर्ग ९ वा (क) यांनी केले, तर आभारप्रदर्शन आर्या वाणी वर्ग ९वा (अ) हिने केले. कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी तथा बहुसंख्य विद्यार्थिनींंची उपस्थिती होती.