हरांबा येथे 11 कुंडीय गायत्री महायज्ञ संपन्न

78

– महायज्ञात रक्तदान, संगीत प्रवचन, संस्कार पूर्णांहुती व महाप्रसाद वितरण

विदर्भ क्रांती न्यूज

सावली : अखिल भारतीय गायत्री परिवार हरांबा तथा समस्त गावकरी मंडळी हरांबा व उमरीच्या वतीने 7 ते 9 जानेवारी या कालावधीत सावली तालुक्यातील हरांबा येथील जीवन विकास विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित तीन दिवसीय 11 कुंडीय गायत्री महायज्ञ, संगीत प्रवचन व दीप महायज्ञ यशस्वीरित्या संंपन्न झाले.

या महायज्ञादरम्यान शनिवार, 7 जानेवारी रोजी सकाळी ग्रामसफाई करण्यात आली व दुपारी तिलमलनाथ मंदिर परिसरातून भव्य मंगल कलश यात्रा (लेझीम सोबत) काढण्यात आली. सायंकाळी संगीत प्रवचन पार पडले.

रविवार, 8 जानेवारीला सकाळी 11 कुंडीय गायत्री महायज्ञ, त्यानंतर वैनगंगाकाठ ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था हरांबाच्या सौजन्याने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले असून ५३ जणांनी रक्तदान केले. सायंकाळी संगीत प्रवचन व 1008 दीप महायज्ञ संपन्न झाले. सोमवार, 9 जानेवारीला सकाळी 11 कुंडीय गायत्री महायज्ञ, विविध संस्कार, पूर्णांहुती व निरोप समारंभ, त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या गायत्री महायज्ञाचा व महाप्रसादाचा हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अखिल भारतीय गायत्री परिवार हरांबा तथा हरांबा व उमरी येथील समस्त गावकरी मंडळी व युवकांनी परिश्रम घेतले.