१४ जानेवारीपासून रंगणार अप्पर डिप्पर प्रिमियर लीगचा थरार

52

– अप्पर डिप्पर प्रिमियर लीगचे सहावे पर्व

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १२ जानेवारी २०२३ : पत्रकार, कर्मचारी, व्यापारी तथा सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने दरवर्षी अप्पर डिप्पर प्रिमियर लीग व करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये खेळाप्रति रुची निर्माण करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा या प्रिमियर लीगचे सहावे पर्व असून स्पर्धेचे उद्घाटन १४ जानेवारीला सकाळी ११ वाजता गडचिरोली येथील चांदाळा रोडवरील गोटुल भूमी मैदानात होणार आहे. ही स्पर्धा २५ जानेवारीपर्यंत राहणार आहे.

क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी डॉ. अनंता कुंभारे राहणार आहेत. प्रमुख अतिथि म्हणून मोटार वाहन निरीक्षक सचिन जमखंडीकर, मोटार वाहन निरीक्षक चेतन पाटील, डॉ. यशवंत दुर्गे, प्रेस क्लबचे अध्यक्ष नंदकिशोर काथवटे, डॉ. प्रशांत चलाख, डॉ. बाळू सहारे, अविनाश भांडेकर आणि नगर परिषदचे उपमुख्याधिकारी रविंद्र भंडारवार उपस्थित राहणार आहेत.

या अप्पर डिप्पर प्रिमियर लीग स्पर्धेत गुरवळा सफारी, चपराळा फ़ॉरेस्ट, भंडारेश्वर फोर्ट आणि मुतनूर मॅजिक असे संघांचे नाव ठेवण्यात आले आहे. यात डॉ. यशवंत दुर्गे, बलराम सोमनानी, अनुराग पिपरे आणि निखिल मंडलवार संघ मालक राहणार आहेत. अप्पर डिप्पर करंडकमध्ये प्रथम बक्षिस ५१ हजार, द्वितीय ४१ हजार तर तृतीय २१ हजार रुपये रोख रक्कम देण्यात येणार आहे.

२५ जानेवारीला समारोपीय कार्यक्रमात आमदार डॉ. देवराव होळी, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, माजी नगरसेवक प्रमोद पिपरे यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार वितरित केल्या जाणार आहे. सदर स्पर्धेत मोठ्या प्रमाणात क्रिकेट संघांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.