जि. प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते टाकीचे भूमिपूजन

74

– इंदाराम येथील नागरिकांना मिळणार शुध्द पिण्याचे पाणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ५ जानेवारी २०२३ : अहेरी तालुक्यातील इंदाराम येथे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग गडचिरोली अंतर्गत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शुद्ध पिण्याचे पाण्याची विहीर व टाकी मंजूर करण्यात आली असून सदर विहीर व टाकीचे भूमिपूजन आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. इंदाराम येथे गावनिर्मितीपासून टाकी उपलब्ध नसून गावातील नागरिकांना शुध्द पिण्याचेे पाणी मिळत नव्हता. मात्र जि. प. अध्यक्ष यांच्याकडे नवीन विहीर व टाकीसाठी मागणी केली असता जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागातून निधी मंजूर करण्यात आला असून भूमिपूजन कार्यक्रम सम्पन्न झाला. करोडो रुपये देवून या टाकी व विहीर बांधकाम करण्यात येणार असून प्रत्येक घरी नळ जोळणी करून पाणी उपलब्ध करून देण्यात येईल.

या भूमिपूजन कार्यक्रमाला सौ. वर्षाताई पेंदाम सरपंच ग्रामपंचायत इंदाराम, वैभव कंकडालवार ग्रा. पं. उपसरपंच इंदाराम, गुलाबराव सोयाम माजी सरपंच तथा विद्यामन ग्रा. प. सदस्य, शालनीताई कांबळे ग्रामपंचायत सदस्य शाकीर शेख, ग्रामपंचायत सदस्य उमेश कोरेत, किशोर तेलंगे, तेजूभाऊ दुर्गे, श्रीनिवास कोत्तावडलावार, एस. बी. तुमडे, मुसली आत्राम, जयराम आत्राम, भिमा पेंदाम, लालू मडावी, बिच्चू मडावी, अनिल पेंदाम, साईनाथ गौरारप, साईनाथ वड्डे, शिवराम पेंदाम, संतोष गौरारप, अशोक पेंदाम, अजय अर्का, मल्लेश गौरारप, रोशन शामलवार, ग्रामपंचायत शिपाई इंदाराम लक्ष्मण आत्राम व गावातील नागरिक उपस्थित होते.