भाजपा महिला आघाडीच्या वतीने महाराष्ट्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा जाहीर निषेध

49

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत असे वक्तव्य करणारे महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा भारतीय जनता पार्टीतर्फे महिला आघाडीच्या वतीने भंडारा येथे जाहीर निषेध कार्यक्रम करण्यात आला. यावेळी उपस्थितांना सुरेखाताई लुंगरे प्रदेश चिटणीस भाजपा महिला मोर्चा, महाराष्ट्र, सौ. रेखाताई डोळस प्रदेश सदस्य भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र तथा धन्यवाद मोदीजी आयाम प्रभारी पूर्व विदर्भ महिला आघाडी यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रामुख्याने शालीनीताई डोंगरे, जिल्हा महामंत्री, शुभांगीताई मेंढे, इंद्रायणीताई कापगाते जिल्हा अध्यक्ष भंडारा व मोठ्या संख्येने महिला आघाडी पदाधिकारी
उपस्थित होते. तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.