खेळाडुंना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध : खासदार अशोक नेते

46

– मूलच्या संघाने पटकाविले रात्रकालीन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ६ जानेवारी २०२३ : गडचिरोली जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात दर्जेदार खेळाडू (fleyer) निर्माण होत आहेत. मात्र त्यांना सोयी सुविधा व मैदान उपलब्ध नसल्याने वरच्या पातळीपर्यंत ते पोहोचू शकत नाही. सोयी-सुविधा अभावी येथील खेळाडू मागे पडलेले आहेत. त्यांना प्रोत्साहन देऊन आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. खेळाडुंच्या विकासासाठी त्यांना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही खासदार अशोक नेते यांनी दिली. रात्रकालीन टेनिस बॉल क्रिकेट (cricket) स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

अनुराग पिपरे फ्रेंड्स क्लब गडचिरोली व जय दुर्गा उत्सव मंडळ एकता चौक इंदिरानगर गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रात्रकालीन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा समारोप काल दि. 5 जानेवारी रोजी करण्यात आला. बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते होते. मुख्य अतिथी म्हणून गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. प्रणील गिल्डा, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष चांगदेवजी फाये, प्रायोजक डॉ. यशवंत दुर्गे, डॉ. अनंत कुंभारे, रविभाऊ मेश्राम, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष गजाननराव नैताम, दैनिक पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी अविनाश भांडेकर, दैनिक भास्करचे जिल्हा प्रतिनिधी रुपराज वाकोडे, प्रफुल चापले, महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष कविता उरकुडे, भाजपचे शहर उपाध्यक्ष विवेक बैस, नितेश खडसे, गजेंद्र डोमळे, विलास नैताम, नरेंद्र भांडेकर, शहर महामंत्री रश्मी बाणमारे, शहर उपाध्यक्ष कोमल बारसागडे, स्पर्धेचे आयोजक अनुराग पिपरे, ऋषिकेश पिपरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 31000 रुपये व आकर्षक चषक मूल क्रिकेट संघाने पटकाविला तर, द्वितीय पुरस्कार 21000 रुपये व आकर्षक चषक जय बजरंग संघ गडचिरोलीने पटकाविला तृतीय पारितोषिक 11,000 रुपये व आकर्षक चषक नितीन गेडाम क्रिकेट संघाने पटकाविला तर चतुर्थ पुरस्कार 5100 रुपये व आकर्षक चषक इंदिरानगर क्रिकेट संघाने पटकाविला.
याप्रसंगी खासदार अशोक नेते, गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विजयी संघाना प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ रोख पारितोषिक व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी प्रायोजक म्हणून मार्कंडेय हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रशांत चलाख, अनंत हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनंत कारेकर, बी. एस. ग्राफिक्सचे संचालक भुपेश डोंगरे, कंत्रालदार प्रणय खुणे, श्री काँक्रीट प्रॉडक्ट व स्वस्तिक इंडस्ट्रीजचे संचालक नकुल कुकडपवार, हॉटेल लँडमार्कचे संचालक रहीम डोढिआ, भूमी एम्पायर गडचिरोली, आर्यन मोटर्सचे संचालक संजय गुप्ताजी, साई समर्थ ट्रेडर्सचे संचालक उमाजी वासाडे, रवी फोटो स्टुडिओचे संचालक रवीभाऊ मेश्राम आदी मान्यवरांनी मोलाचे सहकार्य केले.
बक्षीस वितरण कार्यक्रमाला गडचिरोली शहरातील व इंदिरानगर वार्डातील नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रिकेट स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक अनुराग पिपरे, नितेश खडसे, ऋषीकेश पिपरे, रुपराज वाकोडे, गजेंद्र डोमळे, प्रफुल चापले, विक्की कागदेलवार, किशोर खेवले, जगदीश गडपायले, अरुण शेडमाके, अक्की मडावी, भारत पाकमोडे, संजय बोधलकर, नरेंद्र भांडेकर, अशोक फुकटे, श्रीनिवास भुरसे, राकेश नैताम , टेमसुजी नैताम तसेच अनुराग पिपरे फ्रेंड्स क्लब गडचिरोली व जय दुर्गा उत्सव मंडळ एकता चौक इंदिरानगरचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.