– ९२ विद्यार्थी करणार पर्यटन व प्रेक्षणीय स्थळाचा अभ्यास
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली शहरात नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक डिजिटल शाळा रामनगरची वर्ग ५ ते ८ मधील जवळपास ४५ मुले व ४७ मुली शैक्षणिक सहली करिता ३ जानेवारीला पहाटे ६ वाजता रवाना झाले. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक सुधीर गोहणे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांना लोणार सरोवर, सिंदखेडराजा, खुलताबाद, औरंगाबाद, अजिंठा, वेरूळची लेणी, घृष्णेश्वर मंदिर देवस्थान, शेगाव, सेवाग्राम, कळंब गणपती व आणखी काही ठिकाणे दाखवणार आहेत.
मागील दोन वर्षे कोरोना व एसटी आंदोलनामुळे विद्यार्थ्यांच्या सहली निघालेल्या नवत्या. शालेयवयात मुलांना डबे घेऊन जवळचा डोंगर, नदी, तलावच्या ठिकाणी एकदिवसीय सहल घेऊन जायचे. मुले खेळून, बागडून, सहभोजनाचा आस्वाद घेऊन आनंदाने घरी परतायची. शाळांच्या लांबच्या सहलीसुद्धा प्रेक्षणीय असायच्या.
पर्यटनस्थळे, ऐतिहासिक स्थळे खुली केल्याने पर्यटन व्यवसाय जोरात सुरु आहे. डिसेंबर – जानेवारी कालावधी सहलीचा हंगाम असतो. सहलीनंतर पुढील अभ्यासासाठी नवीन ऊर्जा मिळावी म्हणून पर्यटनस्थळे, निसर्गरम्य ठिकाणे, ऐतिहासिक व धार्मिक स्थळांवर सहलीचे आयोजन केले जाते. सहलीमुळे मुलांना नवनवीन ठिकाणे पाहायला मिळण्याबरोबरच पर्यटनवाढीला मदत होते.
विद्यार्त्यांसोबत सुधीर गोहणे, महेंद्र शेडमाके, मडावी सर, गंधेवार सर, बोकडे मॅडम, मने मॅडम, भोयर सर आदींचा समावेश आहे. शाळेची शैक्षणिक सहल २ एसटी महामंडळ च्या बस मध्ये रवाना करण्यात आली विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी त्यांचे आई-वडील मोठ्या आतुरतेने जमले होते.