भिमा कोरेगाव विजयस्तंभ सलामी व बुध्द विहार पायाभरणी समारंभ

62

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २ जानेवारी २०२३ : १ जानेवारी २०२३ ला तथागत बौध्द समाज मंडळ इंदिरानगरतर्फे भिमा कोरेगाव विजयस्तंभ सलामी व बुध्द विहार बांधकाम पायाभरणीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भन्ते बुध्दज्योती, पंढरी भानारकर, शिवकुमार मेश्राम, पंढरी भैसारे, लहानू गणवीर, किरण उराडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात तथागत बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती प्रज्वलित व प्रतिमांना माल्यार्पण करून करण्यात आली. प्रमुख मान्यवर लहानू गणवीर व किरण उराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सर्व उपासक व उपासिका यांनी एकसाथ भिमा कोरेगाव विजयस्तंभाला सलामी देऊन वंदन केले. भन्ते बुध्दज्योती यांनी सामुहिक वंदना घेऊन सुत्तपठण केले. तसेच यावेळी भन्ते बुध्दज्योती यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवकुमार मेश्राम, पंढरी भानारकर व पंढरी भैसारे यांच्या हस्ते बुध्द विहार बांधकाम पायाभरणीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सचिन पाटील, सुजाता घोनमोडे, सम्बोधी खोब्रागडे, जयश्री नंदेश्वर आदी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन व प्रास्ताविक सचिन पाटील यांनी केले. कार्यक्रमाला इंदिरानगर येथील बौध्द बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तथागत बौध्द समाज मंडळ, इंदिरानगरच्या सदस्यांनी सहकार्य केले.