पोलीस भरती मैदानी चाचणीकरिता येणाऱ्या उमेदवारांची निवास व भोजनाची व्यवस्था

32

– राष्ट्रवादी युवक काँग्रेस गडचिरोलीचा सामाजिक उपक्रम

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली शहरात जिल्हा पोलीस भरती- २०२३ च्या शारीरीक व मैदानी चाचणीकरिता जिल्ह्यातील ३०-३२ हजार उमेदवार अर्ज केले आहेत. त्याची गैरसोय होणार नाही या करीता. २ जानेवारी २०२३ पासून पोलीस भरती मैदानी व शारीरिक चाचणी प्रक्रिया सुरु होत असून जिल्ह्यातील बाराही तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील उमेदवारांची गैरसोय टाळण्याकरीता राष्ट्रवादी युवक कॉग्रेसतर्फे उमेदवारांना निवासाची व भोजनाची निशुल्क व्यवस्था तसेच शहरापासून पोलीस मुख्यालया पर्यंत उमेदवारांना जाण्याकरीता बससेवेचे नियोजन सुध्दा करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. धर्मरावबाबा आत्राम, माजी जि. प. अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, नागपुर महीला विभागीय अध्यक्षा शाहीन हकीम, यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून शारीरिक व मैदानी चाचणीस आलेल्या उमेदवार मुलांची व मुलींची निवास व भोजन व्यवस्था चंद्रपूर मार्गावरील पटेल मंगल कार्यालयात करण्यात आली आहे. तसेच उमेदवारांना शहरातून पोलीस मुख्यालयात जाण्याकरिता मोफत बसेसची व्यवस्था सुध्दा करण्यात आली आहे. या सर्व सामाजिक उपक्रमाचे नियोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष लिलाधर भरडकर, विधानसभा अध्यक्ष रुपेश वलके, शहर अध्यक्ष अमोल कुळमेथे, जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पवार, तालुका अध्यक्ष श्रीधर येरावार, राविकॉचे जिल्हाध्यक्ष चेतन पेंदाम, जिल्हा संघटक रंजीत रामटेके, संजय शिंगाडे, कपील बागडे, योगेश नांदगाये, किशोर बावणे, संकेत जनगणवार, गणेश बावणे, रीतीक डोंगरे, मुझाहीत पठाण, दीपक नंदेश्वर व सर्व राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी योग्य नियोजन करीत आहेत. गरजू उमेदवारांनी सार्वजनिक ठिकाणी व इतरत्र कुठेही आसरा न घेता नियोजित ठिकाणी केलेल्या निवास व्यवस्थेत विश्रांती घ्यावी, असे आवाहन रायुकॉचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर यांनी केले आहे.