वालसरा येथे ग्रामीण मुलांच्या कबड्डी सामन्यांचे उद्घाटन

56

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २ जानेवारी २०२३ :  १ जानेेवारी २०२३ ला वालसरा (तालुका चामोर्शी) येथे विर मराठा कबड्डी क्लब वालसरा यांच्या सौजन्याने ग्रामीण मुलांंचे कबड्डी सामने आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार डॉक्टर देवरावजी होळी गडचिरोली विधानसभा क्षेत्र, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री मधुकर केशवराव भांडेकर जिल्हा युवा मोर्चा महामंत्री उपस्थित होते.
यावेळी श्री. भगरथ पाटील भांडेकर पोलीस पाटील वालसरा, अरुण मडावी सरपंच वालसरा, सुरेश भांडेकर, मारुती भांडेकर, आनंदरावजी कोहळे राजनगट्टा, लक्ष्मण वासेकर आमगाव महाल, मारुती कोपुलवार, महेंद्र वासेकर मुख्याध्यापक, हरीश नंदनवार शिक्षक वालसरा, मारुती दुधबळे, टीकाराम कोपुलवार, रामचंद्र भांडेकर, वामन सातपुते, भिकाजी दुधबळे, खुशाल दुधबळे, गोपाल भांडेकर, हरिदास भांडेकर, मंगलदास सातपुते, लोमेश येडेवार, खोजेन्द्र चलाख, शामराव मेश्राम वालसरा, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.