वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या कैलास गेडेकर यांच्या कुुुटुुंबीयांंना तत्काळ मदत देण्याचे खा. नेते यांनी दिले वनविभागाला निर्देश

57

विदर्भ क्रांती न्यूज

सावली, ११ डिसेंबर २०२२ : वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या घटनेच्या संदर्भातची माहिती भाजपाचे कार्यकर्ते सदानंद किनेकर यांनी तालुकाध्यक्ष अविनाश पाल तसेच खासदार अशोकजी नेते यांचे सहाय्यक दिवाकर गेडाम यांना दिली असता या संदर्भित बातमीची दाखल घेत निलसनी पेटगाव (ता.सावली जि.चंद्रपूर) येथील कैलास लक्ष्मण गेडेकर (वय ४७ वर्ष) हे व्यक्ती शेतशिवाराच्या कामाकरिता गेले असताना सायंकाळ होऊन सुद्धा घरी परत न आल्याने शोधाशोध करुन पता लागला नाही. पण आज जंगल शिवारात पत्ता लागुन मृतदेह आढळल्याने वाघाच्या (tiger) हल्यात त्याचा बळी घेतल्याचे कळल्यानंतर त्यासाठी त्याचा पोस्टमार्टम करून पंचनामा करण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची टिम हजर होऊन पंचनामा करून वाघाच्या हल्ल्यात बळी घेतलेल्या इसमाच्या कुटुंबीयांना अंत्यविधीसाठी तातडीची मदत देण्याचे निर्देश या क्षेत्राचे  खासदार अशोकजी नेते यांनी दूरध्वनीवरून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच काही अडीअडचणी आल्यास तात्काळ मला कळवावे अशाही सूचना याप्रसंगी दिले. यावेळी (२५०००/-) पंचेविस हजाराची मदत देण्यात आली.

याप्रसंगी वनपरिक्षेत्राधिकारी प्रविणजी विरुटकर, वनरक्षक सूर्यवंशी, सरपंच शुभांगी बारसागडे, भाजपाचे कार्यकर्ते सदानंदजी किणेकर तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.