रेल्वे संबंधी प्रलंबित प्रश्न खासदार अशोकजी नेते यांच्या प्रयत्नातून लागले मार्गी

65

– मागणीप्रमाणे वडसा व नागभिड येथे सुपरफास्ट ट्रेनचे स्टॉपेस (थांबा) होणार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ११ डिसेंबर २०२२ : खासदार अशोकजी नेते यांनी रेल्वे संबंधित दिं.११-०८-२०२२ च्या दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने वडसा व नागभिड येथे सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेनचे (train) स्टॉपेजस (थांबा) वडसा जंक्शन स्टेशनवर वर गाडी संख्या 17007/08 सिकंदराबाद दरभंगा (darbhanga express) एक्सप्रेस व नागभीड जंक्शन स्टेशनवर गाडी संख्या 12851/52 बिलासपूर चेन्नई एक्सप्रेस या सुपर फास्ट ट्रेनचे स्टॉपेजेस (थांबा) केंद्रीय रेल्वेमंत्री माननीय अश्विनजी वैष्णव (Ashwinji vaishnav) यांनी मंजुर केलेला आहे.

मागील दोन वर्षे कोरोणाच्या काळात सुपरफास्ट ट्रेनच्या स्टॉपेजेसच्या मागणीनुसार जनतेच्या रेल्वे (railway) संबंधी समस्या प्रवासाच्या सोयी सुविधेच्या दृष्टिकोनातून केंद्रीय रेल्वेमंत्री यांना निवेदनाद्वारे‌ व पाठपुराव्याने सुपरफास्ट ट्रेनचे स्टॉपेज (थांबा) मार्गी लावण्यात यश आले आहे. यासाठी गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री. अशोकजी नेते यांनी अखेर जनतेच्या हिताच काम यशस्वीरित्या पूर्ण झालं याच समाधान खासदार यांनी व्यक्त केले.