खा. अशोकजी नेते यांच्याकडून विठ्ठलपूर येथील सोनटक्के परिवाराची सांत्वनपर भेट

50

– गणपूर येथे हजारे बाबुजी यांच्या मुलाच्या विवाह सोहळाप्रसंगी घरी दिली भेट

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : खासदार अशोकजी नेते यांची दिनांक १८ नोव्हेंबर २०२२ ला चामोर्शी तालुक्यातील विठ्ठलपूूर येथील भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते स्व. सोनटक्के वय ६७ वर्ष हे अल्पशा आजाराने निधन झाले. या घडलेल्या घटने संबंधीतची माहिती युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य स्वप्नील वरघंटे यांनी दिली असता या संबंधिताची दखल घेत खासदार अशोकजी नेते यांनी मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन आम्ही तुमच्या सुख:दुःखात सहभागी आहोत. काही अडीअडचणी असल्यास सोडविण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासित याप्रसंगी केले. तसेच यावेळी विठ्ठलपुर गावातील लोकांनी मंदिरा संबंधित व गावातील इतर समस्या सांगीतल्यावर त्या सुद्धा सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे खासदार अशोकजी नेते यांनी सांगितले.

यावेळी खासदार अशोकजी नेते, गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा, युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य स्वप्नील वरघंटे, आदिवासी मोर्चाचे महामंत्री रेवनाथजी कुसराम, सरपंच सुधाकर गंधे, उपसरपंच जिवन भोयर, हजारे बाबु, प्रकाश सातपुते, ग्रामपंचायत सदस्य संदीपभाऊ, भोयर पाटील, निलकंठ कुंभरे, तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.