गडचिरोली नगर परिषदेने लावलेले अवाढव्य कर त्वरित कमी करावे

82

– अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेने लावलेले अवाढव्य कर त्वरित कमी करावे, अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने केली आहे. आज दुपारी पक्षाच्या एका शिष्टमंडळाने रिपब्लिकन पक्षच केंद्रीय उपाध्यक्ष रोहिवदास राऊत यांच्या नेतृत्वात नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी भंडारवार यांची भेट घेऊन यासंबंधीचे लेखी निवेदन त्यांना सादर केले व मागणीबाबत सविस्तर चर्चा केली.
नगर परिषदेने आकारलेले नवीन कर हे अतिशय अवाजवी व अवाढव्य असून सर्वसामान्य नागरिकांना अजिबात न परवडण्यासारखे आहेत. नव्याने लावलेले वृक्ष कर, शिक्षण कर, मालमत्ता कर, रोजगार हमी कर हे शहरातील वस्तुस्थितीला धरून नाहीत. गडचिरोली शहरातील बरेचसे नागरिक हे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असून बरेच लोक मोलमजुरी करून राहणारे व झोपडपट्टीत वास्तव्य करू आपला उदरनिर्वाह करणारे हायेत अश्या लोकांना नवीन कर अजिबात परवडणारे नाहीत याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.
तरी या बाबीचा विचार करून हे कर त्वरित कमी करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या शिष्टमंडळात रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य प्रकाश दुधे, प्रदेश सचिव प्रा. राजन बोरकर, केशवराव सामृतवार, जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे, विधानसभा अध्यक्ष प्रदीप भैसारे, महिला आघाडीच्या सुरेखाताई बारसागडे, ज्योती उंदीरवाडे, शहर अध्यक्ष अनिल बारसागडे, जिल्हा सचिव अशोक खोब्रागडे, दिलीप वाकडे, जीवन आत्राम, तुकाराम रामटेके, गोपाळ चौधरी व अन्य कार्यकर्त्यांचा समावेश होता.