शिक्षकांनी घेतला विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा भविष्यवेध

62

– गुणवत्तेचा भविष्यवेध प्रशिक्षणाचा समारोप ; उपायुक्त व प्रकल्प अधिकारी यांनी भेट देऊन केले मार्गदर्शन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत तसेच कुरखेडा तालुक्यातील येंगलखेडा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत उच्च माध्यमिक व माध्यमिक शिक्षक तसेच विषयमित्र यांचे दोन दिवसीय भविष्यवेधी शिक्षण प्रशिक्षणाचा शुक्रवारला समारोप झाला. प्रशिक्षणात १३२ शिक्षकांनी व ११५ विषयमित्रांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा भविष्यवेध घेतला. समारोपीय दिवशी आदिवासी विकास विभाग नागपूरचे उपायुक्त दशरथ कुळमेथे व सहाय्यक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी डॉ. मैनक घोष यांनी येंगलखेडा येथील प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन पाहणी केली व प्रशिक्षणार्थिना मार्गदर्शन केले. यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिल सोमनकर उपस्थित होते.

आदिवासी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रम शाळेत भविष्यवेधी शिक्षण शैक्षणिक सत्र 2022-23 पासून सुरू झाले आहे. गडचिरोली येथील समारोपीय कार्यक्रमात सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रभू सादमवार, अपर आयुक्त कार्यालयाचे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एस. के. बन्सोड, लिपिक अजय कुहिटे, एस. एस. पिसाळ, मुकेश गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.

गडचिरोली येथील प्रशिक्षणात गडचिरोली प्रकल्पातील गडचिरोली, पोटेगाव, कारवाफा, रेगडी, भाडभिडी, मार्कंडादेव, पेंढरी, सावरगाव, गोडलवाही, रांगी, मुरुमगाव, सोडे, कुरंडीमाल या १३ शासकीय आश्रमशाळेतील ७७ उच्च माध्यमिक, माध्यमिक व मानधन शिक्षक तसेच ५७ विषयमित्र यांचा समावेश होता.
येंगलखेडा येथे प्रकल्पातील उर्वरित येंगलखेडा, कोरची, कोटगुल, मसेली, ग्यारापत्ती, अंगारा, भाकरोंडी, घाटी, रामगड, सोनसरी, येरमागड या ११ शासकीय आश्रमशाळांतील ५५ उच्च माध्यमिक, माध्यमिक व मानधन शिक्षक तसेच ५८ विषयमित्रांचे प्रशिक्षण पार पडले. 15 व 16 नोव्हेंबरला मुख्याध्यापकांसह पदवीधर प्राथमिक शिक्षक व प्राथमिक शिक्षक यांचे प्रशिक्षण झाले.
प्रशिक्षणात गडचिरोली येथे सहसुलभक म्हणून उच्च माध्यमिक शिक्षक आर. टी. मोहिते, ए. पी. गेडाम, माध्यमिक शिक्षक के. बी. बेझलवार, प्राथमिक शिक्षक ए. बी. गणवीर, आर. एम. पेंद्राम, के. एम. नेहरकर, प्रतिभा बानाईत, बळीराम जायभाये यांनी काम पाहिले. समारोपीय कार्यक्रमात मुख्याध्यापक दुलीचंद राऊत, माध्यमिक शिक्षिका पी. एम. दहागावकर, एम. ई. ठाकूर, नरेंद्र पुरी, सोनल कुलसंगे, सी. डी. नळे तर विषयमित्र अनुष्का पुडो, मनीषा पोटावी, क्रिश आचला, वनिता नैताम, वैष्णवी कावळे, अंकिता हलामी यांनी मनोगत व्यक्त केले.
येंगलखेडा येथे सहसुलभक म्हणून मुख्याध्यापक उमाकांत ढोक, उच्च माध्यमिक शिक्षक काशिनाथ कुंडगीर, विवेक विरुडकर, माध्यमिक शिक्षक मिलिंद निमगडे, पी. आर. बेलपाडे, प्राथमिक शिक्षक नागेश भारसागडे, तुकाराम सोनकुसरे, ए. आर. डबाले, रवींद्र गंडे यांनी काम पाहिले. येंगलखेडा येथील समारोपीय कार्यक्रमात उच्च माध्यमिक शिक्षक संदीप दोनाडकर, विषयमित्र अंजली आत्राम, खुशबू बनपूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन माध्यमिक शिक्षक सी. जी. भिवगडे यांनी केले. सदर प्रशिक्षणाचे वृतलेखन माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे यांनी केले.