राष्ट्रीय सरपंच संसदेच्या गडचिरोली जिल्हा समन्वयकपदी चांगदेव फाये यांची निवड

58

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एमआयटी पुणे अंतर्गत राष्ट्रीय सरपंच संसदचे गडचिरोली जिल्हा समन्वयकपदी चांगदेव फाये यांची निवड करण्यात आली.
नुकत्याच पुणे येथे राष्ट्रीय सरपंच संसदेचे दोन दिवशीय अधिवेशन पुणे येथील एमआयटी युनिव्हर्सिटीमध्ये पार पडले. त्या अधिवेशनात महाराष्ट्र राज्यामधील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेच्या नवनियुक्त पदाधिकारी यांचे सत्कार व नियुक्ती व ओळखपत्र वितरण कार्यक्रम पार पडला.

त्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून केंद्रीय राज्यमंत्री सौ. डॉ. भरतीताई पवार तर अध्यक्ष म्हणून MIT चे कार्याध्यक्ष राहुलजी कराड उपस्थित होते. तर विशेष अतिथी म्हणून मंत्री वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार हे ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये प्रामुख्याने उपस्थित होते. त्यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी यांचा ओळखपत्र व नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यामध्ये गडचिरोली जिल्हा समन्वयक म्हणून कुरखेडाचे चांगदेव फाये यांची निवड करण्यात आली. चांगदेव फाये हे गेल्या अनेक वर्षापासुन सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्य करीत असुन कुरखेडा ग्रामपंचायतचे उपसरपंच कुरखेडा पंचायत समिती सदस्य व विविध कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग असुन त्यांच्या या कामाची दखल घेऊन MIT राष्ट्रीय सरपंच संसदेचे संस्थपक श्री. राहुलजी कराड व राष्ट्रीय प्रमुख समन्वयक श्री. योगेश पाटील यांनी चांगदेव फाये यांची जिल्हा समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे.
देशाच्या शाश्वत व सर्वांगिण ग्रामीण विकास प्रकियेत पंचायतराज व्यवस्थेतील लोकप्रतिनिधींची भूमिका महत्वाची असुन देशाच्या पंचायतराज व्यवस्थेतील सर्व लोकप्रतिनिधींचे राजकीय स्वरूपात संघटन करणे त्यांचे सर्वांगणी दिशा देवुन विविध उपक्रमांचे अभ्यासपूर्वक संयोजन करून त्यांना प्रत्यक्ष ग्रामविकास प्रक्रियेत मौलिक सहकार्य करणे हे राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे असुन ग्रामविकासाचे राष्ट्रीय स्तरावरील हे महत्त्वपूर्ण अभियान यशस्वीरित्या विस्तारित करण्यासाठी सामाजिक क्षेत्रात योगदान देत असलेल्या कार्यरत कार्यकर्ते कडुन सहकार्याची अपेक्षा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सरपंच संसद कार्यक्रम व्यक्त करण्यात आले.
एमआयटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुलजी कराड यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांनी भविष्यात चांगले काम करावे आम्ही पुर्ण ताकदीने आपल्या सोबत कार्य करु असे सांगितले व राष्ट्रीय सरपंच संसदच्या स्थापना मागची भुमिकाची माहिती दिली.
केंद्रीय मंत्री सौ. भरतीताई पवार यांनी या राष्ट्रीय सरपंच संसदेने अनेक गावातील पदाधिकारी यांना विकासात्मक कामे करण्यासाठी मार्ग दाखवावा व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पर्यत करावे. सरकार म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा विश्वास दिला. याप्रसंगी चांगदेव फाये यांनी सदर पदाच्या माध्यमातून लोकांच्या सार्वजनिक विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधी समन्वयातुन योग्य सहकार्य करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
चांगदेव फाये यांनी आपल्या निवडीचे श्रेय राष्ट्रीय सरपंच संसदचे राष्ट्रीय समन्वयक योगेश पाटील, सहसमन्वयक प्रकाशजी महाले, नागपुर विभाग समन्वयक संजय गजपुरे, वर्धा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राष्ट्रीय सरपंच संसदचे पदाधिकारी सरिताताई गाखरे, राष्ट्रीय सरपंच परिषदेचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष दामोधरजी अरगेला व राष्ट्रीय सरपंच संसदच्या पदाधिकारी यांना दिले आहे. चांगदेव फाये यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.