कॅन्सरग्रस्त देशबंधुग्राम येथील रुग्णाला राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केली आर्थिक मदत

102

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील देशबंधूग्राम येथील क्रीष्णा मदन सरकार हे गेल्या काही महिन्यापासून कॅन्सरग्रस्त आहेत. आर्थिक परिस्थितिमुळे त्यांना यावर उपचार घेणेही कठीण होत होते. त्यांनी माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडे मदत मागितली आणि राजे साहेबांनी एका शब्दांत त्यांची आस्थेने विचारपूस करीत आर्थिक मदत केली.
समोरच्या उपचारासाठी नागपूर येथील राष्ट्रीय कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट येथे जा, मी डॉक्टरांशी बोलून तुमची पूर्ण व्यवस्था करतो, अशी हमी यावेळी राजे साहेबांनी दिली. यावर क्रीष्णा मदन सरकार यांनी मदत केल्याबद्दल राजेंचे आभार मानले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गणपती, मुलचेरा येथील नगरसेवक दिलीप आत्राम सह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.