अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची १३ ला इंदोर येथे बैठक

69

– केंद्रीय राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते राहणार उपस्थित

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्यावतीने रविवार, १३ नोव्हेंबर रोजी मध्यप्रदेशातील इंदोर येथील केशरबाग जवळील रेल्वे क्रासींग जवळील विठ्ठल-रूक्मिणी बगीचा येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय विकास परिषदेचे मध्यप्रदेश अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते राहतील. या बैठकीस देशातील संपुर्ण राज्यातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
परिषदेच्या नागपूर येथील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत परिषदेच्या संविधानात दुरूस्तीसंदर्भात ठराव पारीत करण्यात आला होता. या संविधानातील दुरूस्तीच्या स्वीकृती संदर्भात इंदोर येथील बैठकीत विचारविनीमय करून ठरावाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या बैठकीला महाराष्ट्र राज्यातील कार्यकारिणी पदाधिकारी, सदस्य, आजीवन सदस्य, साधारण सदस्य तसेच आदिवासी समाजातील गणमान्य व्यक्तींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे विदर्भ अध्यक्ष अ‍ॅड. मनिराम मडावी, उपाध्यक्ष आदिवासी सेवक घनश्याम मडावी, नामदेवराव मसराम, विदर्भ महासचिव विवेक नागभिरे, विदर्भ महासचिव सचिन पालकर, डॉ. आरतीताई फुफाटे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष नरेश गेडाम, वर्धा जिल्हा अध्यक्ष शरद आडे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रमोद बोरीकर, अकोला जिल्हाध्यक्ष अजबराव उईके, बुलढाणा जिल्हाध्यक्ष सोळंके आदी पदाधिकार्‍यांनी केले आहे.