प्रकल्पस्तरीय क्रीडा संमेलनाचा आज समारोप

144

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत रांगी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा क्रीडांगणावर गडचिरोली प्रकल्पतरीय क्रीडा संमेलन रविवारपासून सुरू झाले. समारोप मंगळवार, ११ ऑक्टोबरला आहे.
या तीन दिवसीय क्रीडा संमेलनात प्रकल्पातील कारवाफा, भडभिडी, सोडे, अंगारा, कोरची या पाच बिटातील २४ शासकीय तर १६ अनुदानित अशा एकूण ४० आश्रमशाळेतील एक हजार साठ खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. १४, १७ व १९ वर्ष वयोगटात कबड्डी, खो- खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, रिले या सांघिक खेळासह लांबउडी, उंचउडी, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, धावणे या वैयक्तिक खेळाचे आयोजन केलेले आहे.
स्पर्धांचा पारितोषिक वितरण सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. मैनक घोष यांच्या हस्ते मंगळवार, ११ ऑक्टोबरला दुपारी २ वाजता होणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहायक प्रकल्प अधिकारी चंदा मगर, निलय राठोड, प्रभू सादमवार, अनिल सोमनकर, सुधाकर गौरकर आदी उपस्थित राहतील. कार्यक्रमास माध्यमिक मुख्याध्यापक अजय आखाडे यांच्यासह सुमारे दोनशे कर्माचारी उपस्थित राहणार आहेत.