जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) येथे जंतनाशक गोळ्यांचे वाटप

74

विदर्भ क्रांती न्यूज

चामोर्शी : सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत उपकेंद्र मुरखळा (माल) च्या वतीने जि. प. उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) येथील शाळेतील मुलांमुलींना जंताचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दिनांक १० ऑक्टोबर २०२२ ला राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्य जंतनाशक गोळ्यांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. याप्रसंगी डाॅ. मीनाक्षी शिंदे, श्रीमती सुनंदा मॅकलवार आरोग्यसेविका, आशा सेविका श्रीमती सुनंदा गुरनुले, आशासेविका श्रीमती वंदना तुंबडे, शाळेतील शिक्षकवृंद श्री. रघुनाथ भांडेकर, श्री. रमेश गेडाम, श्री. जगदिश कळाम, श्री. राजकुमार कुळसंगे, श्री. चंद्रकांत वेटे, श्री. कमलाकर कोंडावार आदी उपस्थित होते.