विदर्भ क्रांती न्यूज
चामोर्शी : शहरातील मध्यभागी असलेल्या ढिवर, केवट समाजाच्या वतीने प्रभाग क्रमांक ९ मध्ये जुनी मच्छी मार्केटजवळ असलेल्या महर्षी वाल्मिकी चौकात येथे असलेल्या वाल्मिकी मंदिरात वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहाने व विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.
या निमित्ताने समाज प्रबोधन, घटस्थापना, पूजाअर्चा, आरती, भजन, कीर्तन, गोपाळकाला करून विविध धार्मिक कार्यक्रमांनी महर्षि वाल्मिक जयंती पार पाडण्यात आली. तसेच महर्षी वाल्मिकी जयंती व कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून महर्षि वाल्मिकी चौकात असलेल्या सभागृहात भूलाई मातेची घटस्थापना करण्यात आली ही परंपरा अनेक वर्षांंपासून समाज बांधव जोपासत आहेत.
यावेळी केवट, ढिवर समाजातील महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते तर श्री दुर्गा साई भजन मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी समाजातील युवकांनी परिश्रम घेतले.