युवा मुस्लिम फाऊंडेशन चामोर्शीच्या शिबिरात २१ युवकांनी केले रक्तदान

58

विदर्भ क्रांती न्यूज

चामोर्शी : युवा मुस्लिम फाऊंडेशन चामोर्शीच्या वतीने ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ईद ए मिलादऊननबी म्हणजेच मोहोम्मद पैगम्बर यांचे जन्म दिवसाचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले .या शिबिरात एकूण २१ नागरिकांंनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान केले.
यात वसीम मुन्वअर अली, ताजु खान, मुज्जु मुन्वअर अली, शाहिद शेख, जावेद शेख, राजिक शेख, न्याजु खान, फरहान शेख, अफ़रोज सय्यद, गुरू सातपुते, सचिन सयाम, प्रेम आत्राम, सुमित नैताम, शरद गदेवार, निलेश रेड्डीवार, विवेक दुर्गे, देवेंद्र दुधबळे, गौरव आक्केवार, विक्की कटारे, दीपंकर साना, अरविंद चावरे यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदान केलेल्या युवकांंना वैद्यकिय अधिक्षक डॉ. इंद्रजीत नागदेवते यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. रूग्णालयातर्फे डॉ. नागदेवते, त्यांची सहकारी शारदा गवळे आणि त्यांची चमू यांनी सहकार्य केले. सदर माहिती युवा मुस्लिम फाऊंडेशनचे आयोजक अल्ताफ शेख यांनी दिली. सामान्य रुग्णालय येथील रक्त संक्रमण टिमने मोलाचे सहकार्य केले.