भाजपचे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे यांचा अभिष्टचिंतन सोहळा थाटात

110

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य तथा भाजपचे जेष्ठ नेते माननीय रमेशजी भुरसे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आज सोमवारी येथील इंदिरा गांधी चौकातील शासकीय विश्रामगृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देताना व अभिनंदन करताना भाजपचे जिल्हा महामंत्री माननीय प्रमोदजी पिपरे, जिल्हा म्हामंत्री प्रशांतजी वाघरे, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी शहर अध्यक्ष सुधाकरराव यनगंधलंवार, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, माजी नप उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, माजी नगरसेवक तथा भाजपचे शहर अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, माजी नगरसेवक केशवजी निंबोड, विलास पा. भांंडेकर, नामदेव शेंडे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, माजी नगरसेवक भूपेश कुळमेथे, दत्तुजी माकडेे, वासुुुदेव बट्टे, राजूभाऊ शेरकी, युवा मोर्चाचे जिल्हा सचिव निखिल चरडे, बंंडू झाडे, सोमेश्वर धकाते, श्यामजी वाढई, राकेश राचमलवार, जीवन गोडे, किशोर भांडेकर, अमित हेमके उपस्थित होते.