माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे जुन्या रेपनपल्ली येथील गावकऱ्यांनी दिले निवेदन

41

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : ग्रा. पं. रेपणपल्ली अंतर्गत येत असलेल्या सगळ्यात जुनी वस्ती असलेल्या (जुनी) रेपणपल्ली येथील गावकऱ्यांच्या अर्जानुसार दिनांक 16/09/2022 रोजी ग्रामसभा घेतले असता मौजा (जुनी) रेपणपल्ली हे गाव वेगळ्या करण्यास ग्रामसभामध्ये सर्वानुमते ठरविण्यात आले. माजी जि. प. अध्यक्ष श्री. मा. अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे मौजा (जुनी) रेपणपल्ली हे गाव घोषित करण्यास सर्व गावकऱ्यांनी मिळून मा. अध्यक्ष साहेब यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी गावातील माजी पं. स. सभापती सौ. सुरेखा आलाम, मोबीन सडमेक, राकेश सडमेक, कैलास सिडाम, अविनाश कोडापे, सुनील येलाम, गुलाब येलाम, बापू सिडाम, सत्यम आत्राम, दौलत आलाम, दिलीप कोडापे, नरेश सिडाम उपस्थित होते.