गानली समाजाच्या एकजुटीमुळेच खंडोबा मंदिराचे निर्माण : माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे प्रतिपादन

75

= गानली समाज बहु. मंडळाकडून अहेरी येथे सामूहिक कोजागिरी पौर्णिमाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अहेरी येथे गानली समाज बहु. मंडळाकडून इंडियन फक्शन हाॅल येथे सामूहिक कोजागिरी पौर्णिमाचा कार्यक्रम आयोजित करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजाचे प्रतिष्ठित व्यंकटेश बोम्मावार (कंत्राटदार) तसेच प्रमुख अतिथी म्हणून समाजाचे प्रतिष्ठित अजय कंकडालवार (माजी जि. प. अध्यक्ष गडचिरोली) तसेच प्रमुख पाहुणे आणि गानली समाज मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास गद्देवार व्यासपीठावर विराजमान होते. सदर कार्यक्रमात गानली समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम व समाजातील महिलांनी गरभा नृत्य सादर केले आणि पुरुष तसेच बालक वर्ग उत्साहाने सहभागी झाले. समाज मंडळाद्वारे धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून त्यांच्या सत्कार करण्यात आला. समाजात विविध उपक्रम राबविले जावेत त्यासाठी समाजातील प्रतिष्ठित नागरिकांचा नेहमीच सहकार्य राहील, असे मान्यवरांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्दमा येनगंटीवार यांनी केले तर प्रास्ताविक रविंद्र बोम्मावार यांनी केले. गानली समाज बहु.मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास गद्देवार यांनी आपल्या भाषणात समाजातर्फे सुरू असलेल्या मंदिर व सभागृह बांधकामात येत असलेल्या अडचणी समाजापुढे मांडल्या. कार्यक्रमला उपस्थित समाजाचे प्रतिष्ठित राजू बोम्मावार, सत्यनारायण गद्देवार, लक्ष्मण गद्देवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अजय कंकडालवार (माजी जि प अध्यक्ष गडचिरोली) यांनी समाजातील युवक शिक्षण व रोजगाारापासून वंचित राहू नये. समाज एकजुटीने राहून निर्माण होत असलेल्या खंडोबा मंदिर व सभागृह येत्या एक वर्षाच्या आत सम्पूर्ण करून पुढची कोजागिरी आपल्या मंदिरात करू, असे प्रतिपादन केले व मी नेहमीच समाजासाठी तत्पर असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जुगल बोंमनवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गानली समाज बहु.मंडळाचे सदस्य व समाज बांधवांनी पुढाकार घेतला.