Home गडचिरोली काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

61
Oplus_16908288

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जंगली हत्तीच्या हल्ल्यात नुकसान झालेल्या शेतीची गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाकडून त्यांना भरघोस आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही ॲड. कोवासे यांनी दिली. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश पाचभाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरीव मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. वन विभागाने पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

यावेळी नगरसेवक रमेश चौधरी, माजी नगरसेवक बंडू शनिवारे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, नंदूभाऊ वाईलकर, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, जेष्ठ नेते जितू मुनघाटे, स्थानिक शेतकरी आशिष सालोटकर, जितेंद्र मुप्पीडवार दीपक चौधरी, तसेच मजूर वर्ग आणि गावातील शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!