Home गडचिरोली ‘मानव सेवा हीच ईश्वर सेवा’ संतोषभाऊंचा अनुकरणीय उपक्रम

‘मानव सेवा हीच ईश्वर सेवा’ संतोषभाऊंचा अनुकरणीय उपक्रम

24

– वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ कमलापूर येथे हजारो पर्यटकांसाठी पाणपोईची उभारणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमध्ये तहानलेल्या प्रवाशांना आणि पर्यटकांना दिलासा देण्यासाठी कमलापूर येथे सामाजिक बांधिलकी जपत संतोषभाऊ ताटीकोंडावार यांनी एक प्रेरणादायी उपक्रम राबविला आहे. आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी कमलापूर परिसरात येणाऱ्या हजारो पर्यटकांसाठी थंड पिण्याच्या पाण्याची पाणपोई उभारून ‘मानव सेवा हीच ईश्वर सेवा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला आहे.

कमलापूर हे पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात पर्यटक, प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांची ये-जा सुरू असते. विशेषतः उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. हीच गरज ओळखून संतोष भाऊ यांनी स्वतः पुढाकार घेत पाणपोईची व्यवस्था केली. या ठिकाणी स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले असून प्रवाशांकडून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

आजच्या स्वार्थी युगात अनेक जण केवळ स्वतःपुरते विचार करत असताना संतोष भाऊ यांनी समाजाप्रती आपली जबाबदारी जपत वडिलांच्या स्मृतीला मानवतेची जोड दिली आहे. त्यांच्या या कार्यामुळे परिसरात सामाजिक सलोखा व सेवाभावाचा आदर्श निर्माण झाला आहे. माणुसकी जपणारे हातच खरे समाजाचे आधारस्तंभ असतात, याची प्रचिती या उपक्रमातून येत आहे.

स्थानिक नागरिकांनीही या पाणपोई उपक्रमाचे स्वागत करत संतोषभाऊ यांचे अभिनंदन केले आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत हजारो नागरिकांची तहान भागवणारा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून सामाजिक क्षेत्रात अशाच सेवाभावी कार्यांची गरज असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

समाजासाठी निस्वार्थ भावनेने केलेले कार्य हेच खरे पुण्यकार्य असते. संतोष भाऊ यांनी उभारलेली ही पाणपोई केवळ पाण्याची व्यवस्था नसून ती माणुसकी, सेवा आणि संस्कारांची जिवंत ओळख ठरत आहे.

error: Content is protected !!