विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : दि. ६ ॲाक्टोबर २०२२ सार्वजनिक नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ धानोरा जि. गडचिरोली यांनी आयोजित केलेल्या काल्याच्या कार्यक्रमात दहिहंडी फोडताना डॉ. एन. डी. किरसान महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी, वामनराव सावसाकडे जिल्हाध्यक्ष किसान काँँग्रेस, नगरसेवक माणिकशाहा मडावी, प्रदिप बोगा, देवांगणा चौधरी, गोपिदास चौधरी, राजुभाऊ मोहुरले, राजुभाऊ जिवानी, भाष्करभाऊ सय्याम, विनोद लेनगुरे व मंडळाचे सदस्य व नागरीक उपस्थित होते. यावेळी भारत जोडो पदयात्रे संदर्भात माहिती देऊन सहभागी होण्याच्या अनुषंगाने पत्रके वाटण्यात आली.
तसेच कासवी ता. आरमोरी जि. गडचिरोली येथे “एक गांव एक दुर्गा” उत्सवानिमित्त गोपालकाल्याचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी प्रमुख अतिथी महाराष्ट्र प्रदेश काँँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. एन. डी. किरसान, किसान काँँग्रेस जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे, माजी जि. प. सदस्या मनीषाताई दोनाडकर, महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा रोशनीताई बैस, दिलीपजी घोडाम, मंडळाचे पदाधिकारी व सदस्य, मनस्वीनी मंचच्या सदस्या व गावकरी उपस्थित होते.