लॉयड्स मेटल्स कंपनीचा पुढाकार : गर्भवती महिलेला केला रक्ताचा पुरवठा

58

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सुशीला आऊलवार या गर्भवती महिलेला AB रक्ताची अत्यंत गरज होती. त्यांना अहेरी ग्रामीण रुग्णालयातून गडचिरोली येथे स्थानांतर करण्यात आले. मात्र रक्त न मिळाल्याने ते परत अहेरीला आले. संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून ३ दिवस सुचिता खोब्रागडे, साई तुलसीगिरी व संजय आक्केवार यांनी अनंत प्रयत्न केले. मात्र दुर्मिळ रक्तगट असल्याने कुठेच मिळेना. मग सुशीलाजीने टायगर ग्रुपला संपर्क केला. मग ग्रुपच्या सदस्यांनी सी-६०, एसआरपीफ अश्या सगळ्या ठिकाणी विचारपूस केली. अखेरीस लॉयड्स मेटल्स कंपनीचे अधिकारी श्री. विनोद कुमार यांना संपर्क केले. कंपनीमध्ये एकूण ७ AB – ब्लड ग्रुपचे कर्मचारी आहेत, अशी माहिती विनोद कुमार सरांनी दिली. तत्काळ रक्तदान करायला निरप्राज जाह हे अहेरी येथील ग्रामीण रुगणालयात येऊन त्यांनी त्या अत्यावश्यक गर्भवती महिलेकरिता रक्तदान केले. यावेळी विनोद कुमार, संजयभाऊ अक्केवार व टायगर ग्रुप आलापल्लीचे प्रमुख साईभाऊ तुलसीगारी, धनराज चक्रमवार उपस्थित होते.