माजी जि. प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व माजी पं. स. सभापती सोनालीताई अजय कंकडालवार यांनी अहेरी येथील दुर्गामातेच्या पुजेला उपस्थित राहुन मातेचे घेतले दर्शन

51

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : नवरात्रो उत्सवात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार व माजी पं. स.सभापती सोनालीताई अजय कंकडालवार यांनी सोमवार, 4 ऑक्टोबर रोजी अहेरी येथील श्री. आदर्श दुर्गोत्सव मंडळ येथे नवदुर्गा मातेचे दर्शन घेऊन पूजाअर्चा केली. माता चरणी नतमस्तक होऊन सुख, शांती व समृद्धी लाभो अशी मनोकामना केली. यावेळी चिरंजीव युवराज अजय कंकडालवार व विराज अजय कंकडालवार होते. यावेळी उपस्थित अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्षा रोजा करपेत, नागरपंचयातचे उपाध्यक्ष श्री. शैलेंद्र पटवर्धन, नगरपंचायतचे बालकल्याण सभापती सौ. मिनाताई ओंडरे, नगरसेविका सौ. सुरेखा गोडसेलवार, नगरसेविका सौ. जोतीताई साडमेक, नगरसेविका शेख, नगरसेवक श्री. विलास सिडाम, नगरसेवक श्री. विलास गलबले, नगरसेवक श्री. महेश बाकेवार, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, श्री. अजय सडमेक, कुमार गुरनुले तसेच संघटनेचे कार्यकर्ते उपस्तीत होते. त्यावेळी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.