राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या सेवा पंधरवडा या निमित्ताने सुमानंद सभागृह गडचिरोली येथे आयोजित बुद्धिजीवी संमेलन, चर्चासत्र व मा. मोदीजींच्या जीवनावरील चित्र प्रदर्शनीचे खा. अशोकजी नेते यांच्या हस्ते उद्घाटन

72

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : केंद्र सरकारने केलेल्या जनकल्याणकारी कार्याची माहिती व त्याचा लाभ जनतेला मिळवून देण्यासाठी समस्त भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी काम करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार अशोकजी नेते यांनी केले. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या सेवा पंधरवड्यानिमित्त गडचिरोली येथील सुमानंद सभागृह येथे आयोजित बुद्धिजीवी संमेलन, चर्चासत्र व नरेंद्रजी मोदी यांच्या जीवनावरील चित्र प्रदर्शनी व बुद्धिजीवी यांच्या चर्चासत्र कार्यक्रमाप्रसंगी केले.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना खासदार अशोकजी नेते पुढे म्हणाले, भारताचे लोकप्रिय पंतप्रधान, विश्व गौरव, आत्मनिर्भर भारताचे प्रणेते, नरेंद्र मोदीजी हे एक ‘लोकनेते’ आहेत. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा आणण्यासाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले आहे. त्यांना लोकांमध्ये राहायला, त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला आणि त्यांची दु:खं दूर करण्यात समाधान मिळते. लोकांशी थेट संपर्काबरोबरच ऑनलाईन संवादाचीही ते जोड देतात. ही व्यक्ती, साहस, करूणा आणि विश्वासाची साकार मूर्ती आहे. भारताचे नवनिर्माण करण्याच्या तसेच त्याला जगासाठी दीपस्तंभ बनवण्याच्या विश्वासापोटी भारतीयांनी त्यांना आपला जनादेश दिला. देशाचे यशस्वी लोकप्रिय पंतप्रधान राष्ट्रनेता आदरणीय नरेंद्रजी मोदी सरकारच्या जन कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य गोरगरीब जनतेला मिळवून देण्यासाठी तमाम भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अविरत कार्य करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांनी केले.

भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या १७ सप्टेंबर या जन्म दिवसापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या २ ऑक्टोबर या जयंतीपर्यंत ”राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीचे वतीने उपस्थित शेतकरी शेतमजूर, सर्वसामान्य कामकरी, कष्टकरी लाभार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या बुद्धिजीवी नागरिक, पदाधिकारी, नागरिकांचा सत्कारही प्रामुख्याने करण्यात आला.

या कार्यक्रमाप्रसंगी खा. श्री. अशोकजी नेते यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवते, आम. डॉ. देवरावजी होळी, ओबिसी विदर्भ संपर्क प्रमुख तथा जेष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, संघटन जिल्हा महामंत्री रविंद्रजी ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, कि. आ. प्रदेश सदस्य तथा जेष्ठ नेते रमेशजी भुरसे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेवजी फाये, शहराध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, माजी जि. प. अध्यक्षा सौ. योगिताताई भांडेकर, माजी नगराध्यक्षा सौ. योगिताताई पिपरे, प्रदेश संपर्क प्रमुख सदानंदजी कुथे, महिला आघाडी प्रदेश सदस्या रेखाताई डोळस, कि. आ. जिल्हा अध्यक्ष रमेशजी बारसागडे, अल्पसंख्यांक आ. मो. अध्यक्ष बबलुभाई हुसैन, युवा शहर अध्यक्ष सागर कुमरे, युवा शहर महामंत्री हर्षल गेडाम, कविताताई उरकुडे, वैष्णवी नैताम, रोशनी बानमारे, गिताताई कोडापे, प्रितीताई शंभरकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, आशिष पिपरे, अनिल तिडके तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.