गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्ताने जीवन साधना गौरव पुरस्कारासह विविध पुरस्कार वितरण सोहळ्यात खा. अशोकजी नेते यांची उपस्थिती

80

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज 2 ऑक्टोबर रोजी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्ताने जीवन साधना गौरव पुरस्कारासह विविध पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी खा. अशोकजी नेते, गडचिरोली – चिमूूर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु. जनजाती मोर्चा प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना खा. अशोकजी नेते म्हणाले, केंद्रशासनाकडून गोंडवाना विद्यापीठात सर्व सोयी सुविधा या ठिकाणी आपण निर्माण करू. एवढेच नाही तर चांगले उपक्रम सुरू करू. गोंडवाना युनिवर्सिटी जिल्ह्यांमध्ये अधिकृत चांगले विद्यापिठ होईल असा माझा प्रयत्न आहे. या ठिकाणी आपण एक चांगला प्रोजेक्ट सुरूकरुन स्किल डेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी निधी कसा आणता येईल या दृष्टीनेसुद्धा माझा प्रयत्न आहे.

गोंडवाना विद्यापीठ हे गडचिरोली या अतिदुर्गम भागातील आकांक्षीत जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेल्या जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाने स्थापित केलेले विद्यापीठ आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचा रहिवास, वनसंपदा व भौगोलिकदृष्ट्या असलेले दुर्गम स्थान विचारात घेता, विद्यापीठ परिक्षेत्रातील युवक व युवतींना नवउद्योजक (स्टार्ट अप्स) म्हणून स्थापित करण्यास्तव नवसंशोधन केंद्राची (इन्क्युबेटर) सुविधा विद्यापीठात उपलब्ध होणे अत्यावश्यक होते, असे ते म्हणाले.

गोडवाना विद्यापीठात उत्कृष्ट कार्याबद्दल जीवन साधना गौरव पुरस्कार, उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार, उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार प्रदान या प्रसंगी करण्यात आले.

याप्रसंगी खा. अशोकजी नेते, गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु-जनजाती मोर्चा यांच्यासह आमदार डॉ. देवरावजी होळी, माजी कुलगुरू पंजाब कृषी विद्यापीठ अकोला डॉ. शरद निंबाळकर, कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ डॉ. प्रशांत बोकारे, प्र. कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली डॉ. अनिल हिरेखण, गौरव पुरस्कर्ते मोहन हिराबाई हिरालाल तसेच पुरस्कर्ते विद्यापीठाचे प्राध्यापक व प्राध्यापिका आणि विद्यार्थी उपस्थित होते.