गोंडवाना विद्यापीठाने गुणवत्तांची दखल घेवून सत्कार केला हे अभिनंदनीय : आमदार डॉ. देवरावजी होळी

89

– गोंडवाना विद्यापीठाच्या जमीन अधिग्रहणाचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा अशी विद्यापीठ प्रशासनाला सूचना

– गोंडवाना विद्यापीठ देशातील सर्व विद्यापीठांचे नेतृत्व कसं करेल यासाठी काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन

– सर्व सत्कारमूर्तींचे अभिनंदन करीत भावी वाटचालीस दिल्यात शुभेच्छा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाने नेहमीच गुणवंतांचा सत्कार केला असून त्यासाठी गोंडवाना विद्यापीठ अभिनंदनास पात्र असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

यावेळी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. कुलगुरू डॉ. प्रशांतजी बोकारे, प्रमुख अतिथी डॉ. पंजाबराव देशमुख विद्यापीठ अकोलाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकरजी, प्र-कुलगुरू डॉ. श्रीरामजी कावळे, कुलसचिव डॉ. अनिलजी हिरेखन, सत्कारमूर्ती मोहन हिराबाई हिरालाल मंचावर उपस्थित होते.

यावेळी आमदार डॉ. देवरावजी होळी म्हणाले की, गोंडवाना विद्यापीठाची स्थापना आजच्या २ ऑक्टोबर या दिवशी झाली. आज २ महापुरुषांची जयंती असून हा उत्तम योग आहे.गोंडवाना विद्यापीठांने मागील वर्षी आदिवासी समाजात, क्षेत्रात काम करणारे समाजसेवक मा. देवाजी तोफा यांना डॉक्टरेट देऊन त्यांचाही सन्मान केला त्याबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन केले.

गोंडवाना विद्यापीठाचा प्रलंबित जमीन अधिग्रहणाचा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी निकाली लावला असून २०२२ च्या मूल्यांकन दरानुसार शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देऊन लवकरच या जमिनीचे अधिग्रहणही होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

गोंडवाना विद्यापीठाने उत्तमोत्तम्म कार्य करून या जिल्ह्याचे नाव देशात पुढे न्यावे. देशातील सर्व विद्यापीठांचे नेतृत्व हे विद्यापीठ कसं करेल यासाठी काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी त्यांनी मोहन हिराबाई हिरालाल यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच पुरस्कार प्राप्त सर्व सत्कारमूर्तींचे अभिनंदन करीत सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा ही दिल्यात.