हरांबा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

120

– ग्रामपंचायत हरांबाकडून शाळा व अंगणवाडीला कचरापेटीचे वाटप

विदर्भ क्रांती न्यूज

सावली : तालुक्यातील हरांबा येथील जिल्हा परिषद शाळेत आज 2 ऑक्टोबर 2022 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने सकाळी प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे झाली. यावेळी ग्रामपंचायत हरांबाकडून शाळा व अंगणवाडीला कचरापेटीचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच अश्विनी बोदलकर, उपसरपंच प्रविण संतोषवार, ग्रामपंचायत सदस्य देवानंद मानकर, ग्रामसेवक कडस्कर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सौदागर चौधरी, शाळेचे मुख्याध्यापक शिंदे, शिक्षक डोईजड, शिक्षक कायरकर, शिक्षिका चिंतलवार, शिक्षिका कुळमेथे, अंगणवाडी सेविका रज्जू वरगंटीवार, कांचन संतोषवार, अल्का वाकडे आदींची उपस्थिती होती.