राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्त कुरुड – विसापूर जिल्हा परिषद क्षेत्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन

90

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हा सेवा पंधरवडा राष्ट्रनेता मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या १७ सप्टेंबर या जन्म दिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या २ ऑक्टोंबर जयंतीपर्यंत संपूर्ण देशामध्ये सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्या प्रित्यर्थ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा गडचिरोली महामंत्री मा. मधुकरभाऊ भांडेकर यांच्या वतीने भाजप गडचिरोली जिल्हा अध्यक्ष मा. श्री. किसनजी नागदेवे यांच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने कुरुड-विसापूर जिल्हा परिषद क्षेत्रातील विसापूर, खोरदा, हिवरगाव, मुरमुरी येथील शासकीय, निमशासकीय शाळेत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित शक्ती केंद्रप्रमुख रमेशभाऊ नरोटे, सुभाषभाऊ कोठारे माजी सरपंच तथा ग्रा. पं. सदस्य आमगाव महाल, सुनीलभाऊ शेडमाके माजी सरपंच मुरमुरी, जिल्हा युवा मोर्चा सदस्य लक्ष्मण वासेकर, भाजपा कार्यकर्ते चापडेजी, ग्रा. पं. सदस्य कारडेजी, मनीषजी भांडेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक, गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.