शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता : पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मान्यवरांचे प्रतिपादन

277

– सेवानिवृत्त शिक्षकांचा व प्राविण्ययप्राप्त सभासद पाल्यांचा सत्कार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शिक्षक सहकारी पतसंस्था ही सभासदांसाठी आधारस्तंभ असून समाजातील सुजाण घटक असलेल्या शिक्षक सभासदांच्या कल्याणासाठी झटणार्‍या प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्यााचे प्रतिपादन मान्यवरांनी केले. प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित गडचिरोलीची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार १८ सप्टेंंबर रोजी आरमोरी मार्गावरील सुमानंद सभागृहात पार पडली.

सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष उत्तम म्हशाखेत्री होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे मानद सचिव आशिष धात्रक, उपाध्यक्ष दिलीप कुनघाडकर, खजिनदार सुरेश वासलवार, संचालक धनेश कुकडे, राजेश चिलमवार, सुरेश निंबोरकर, सरिता पोरेटी, सुधीर गोहणे, चंदू रामटेके, कल्याणी चौधरी, सुनंदा चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

सभेत सेवानिवृत्त शिक्षकांचा सहपत्नीक साडीचोळी व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. इयत्ता दहावी बारावी व पदवी परीक्षेत विशेष प्राविण्यप्राप्त केलेल्या सभासद पालकांचा भेट व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. संस्थेच्या अहवाल पुस्तिकेचे वाचन संस्थेचे मानद सचिव आशिष धात्रक यांनी केले. तसेच संस्थेतील सभासदांच्या शंका, समस्यांचे समाधान केले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना मान्यवरांनी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या आतापर्यंतच्या वाटचालीत केलेल्या सहकार्याचा उल्लेख करीत यापुढेही सभासदांनी असेच सहकार्य करावे, असे आवाहन केले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.वार्षिक सर्वसाधारण सभा पार पाडण्यात ज्यांची सहकार्य लाभले अशा सर्व सभासदांचे संचालक मंडळाच्यावतीने आभार मानण्यात आले. यावेळी सभासद, त्यांचे पाल्य, पतसंस्थेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या यशस्वीतेसाठी पतसंस्थेच्या कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.