जुन्या पेन्शनसाठी बाईक रॅलीतून कर्मचाऱ्यांनी केली गर्जना ; शासकीय – निमशासकीय कर्मचारी व शिक्षकांचा सहभाग

99

– आंदोलनात विविध कर्मचारी संघटनांचा सहभाग

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एनपीएस योजना रद्द करून सर्व कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी परिभाषीत पेंशन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समिती जिल्हा गडचिरोलीच्या वतीने काल बुधवारी भव्य बाईक रॅली काढून शासनाचे लक्ष वेधण्यात जुनी पेंशन योजना लागू झालीच पाहिजे अशी गर्जना कर्मचाऱ्यांनी केली. बाईक रॅली गडचिरोली बसस्थानकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, जुनी पेंशन योजना लागू करावी या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले. कर्मचारी संघटनांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एनपीएस बाबत विचारविनीमय करून योग्य तो निर्णय घेण्यासाठी शासनाने 19 जानेवारी 2019 रोजी सकारात्मक पावले उचलून अर्थराज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन केली होती. परंतू साडेतीन वर्षाचा काळ लोटून सुध्दा कोणताही निर्णय होउुन शकला नाही. त्यामुळे शासनाप्रती राज्यातील कर्मचारी वर्गामध्ये असंतोष खदखदत आहे. त्यामुळे शासनाने कर्मचायांच्या हितासाठी जुनी शासकीय पेंशन योजना लागू करण्याबाबत तातडीने आदेश काढावेत, अशी मागणी बाईक रॅलीच्या माध्यमातून राज्यशासकडे करण्यात आली.

बाईक रॅली आंदोलनात संघटनेचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, निमंत्रक एस. के. चडगुलवार, सरचिटणीस रतन शेंडे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे दुधराम रोहनकर, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे भास्कर मेश्राम, ए. आर. गडप्पा, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक देशमुख, प्राथमिक शिक्षक संघाचे रघुनाथ भांडेकर, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपूरकर, दामोधर पटले सरचिटणीस ग्रामसेवक युनियन, फिरोज लांजेवार सरचिटणीस, अखिल श्रीरामवार कोषाध्यक्ष जिल्हा परिषद लिपीक संघटना, गजानन ठाकरे अध्यक्ष, राजू रेचनकार सचिव जिल्हा परिषद चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना, निलुताई वानखेडे अध्यक्ष नर्सेस संघटना, मंगलाताई बिरनवार अध्यक्ष अंगनवाडी पर्यवेक्षिका संघटना, आशीष धात्रक सरचिटणीस जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघ, नसरुद्दीन हकिम अध्यक्ष, चेतन जमकातन सचिव जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना, सुरेद्र खरवडे अध्यक्ष, विनोद सोनकुसरे सचिव जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना, गणपत काटवे अध्यक्ष पशुचिकित्सा व्यवसाय संघटना, राजकुमार पारधी कार्याध्यक्ष संजय खोकले, उपाध्यक्ष जिल्हा परिषद कमॅचारी महासंघ, धनंजय दुमपट्टीवार जिल्हा परिषद लिपीक संघटना यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.