सौ. बिणाराणी देवरावजी होळी यांच्या हस्ते चामोर्शी रुग्णालयात रुग्णांना फळ

53

– मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवाड्याच्या निमित्ताने रुग्णांना केले फळ वाटप

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : विश्व गौरव, देशाचे लाडके लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच १७ सप्टेंबरपासून ते २ ऑक्टोबर या महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पंधरवड्याचे औचित्य साधून गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या धर्मपत्नी सौ. विनाराणी देवरावजी होळी यांच्या हस्ते चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

यावेळी तालुका भाजपा महामंत्री भोजराज भगत, साईनाथ बुरांडे, ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री तथा मूरखळा मालचे सरपंच भास्कर बुरे, जेष्ठ नेते जयराम चलाख, युवा मोर्चाचे चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रतीक राठी, संजय चलाख, अमोल रामगोंवार, नरेश अलसावार, पुरुषोत्तम बोरकुटे, शेषराव कोहळे, भाऊजी दहेलकर, एकनाथ सातपुते, रामचंद्र वरखडे यांच्यासह भाजप नेते व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.