राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा उपविभागीय कार्यालयासमोर निषेध आदोलन

64

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गुजरातशी इमानदारी दाखविण्यासाठी शिंदे – फडणवीस सरकारने महाराष्ट्र राज्यातील पुण्यामध्ये होणार असणारा वेदांता गृप व फॉक्सकॉनची भागीदारी असलेला सेमीकन्डक्टर निर्मितीचा प्रकल्प गुजरातला हलवण्याच्या निर्णयाला मुक संमती दिली आहे. वेदांत गृप व फॉक्सकॉन कंपनी यांच्या भागीदारीतून वीस बिलियन डॉलर्सची गुंतवणूक असलेला प्रकल्प आज सरकारच्या चाटूगीरी निर्णयामुळे महाराष्ट्राच्या हातातून गेलेला आहे. याचा निषेध करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात शेेेकडो युवकांच्या उपस्थितीत निषेध आंदोलन उपविभागीय कार्यालय देसाईगंजच्या समोर करण्यात आले.
हा प्रकल्प जर महाराष्ट्रात झाला असता तर सुमारे वीस बिलियन डॉलर्स म्हणजेच एक लाख अट्ठावन हजार कोटी इतकी भांडवली गुंतवणूक महाराष्ट्रात झाली असती. त्यातून सुमारे एक लाख पन्नास हजार राज्यातील युवकांना रोजगार मिळू शकला असता. २०१४ मध्ये वर्षाकाठी दोन कोटी युवकांना रोजगार देण्याची घोषणा करणाऱ्या भाजप सरकारने अख्या आठ वर्षाच्या त्यांच्या सत्तेतील कारकिर्दीत दोन कोटी तरुणांना रोजगार दिला नाही. देशात सर्वात जास्त महाराष्ट्र राज्यातून केंद्राला सर्वाधिक जीएसटी दिला जातो. मग महाराष्ट्राच्या बाबतीतच जाणीवपूर्वक अशी विरोधी भूमिका केंद्र शासन वारंवार का घेतात याचे उत्तर सुगा स्थानिक भाजपा नेते देत नाही. असे अनेक प्रश्न करीत राज्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करुण देण्याची मागणीसह शिंदे – फडणवीस सरकारचा निषेध करण्यात आला. सध्याचा सरकार महाराष्ट्रातील बेरोजगारी युवकांवर अन्याय करुन गुजरात व विशेष प्रेम दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात उपविभागीय कार्यालयावर निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी राकाँँचे अध्यक्ष रविंद्र वासेकर, युवक अध्यक्ष लिलाधर भरडकर, प्रदेश सरचिटणीस रिंकू पापडकर, प्रदेश संघटक युनूस शेख, प्रसाद पवार, अमोल कुळमेथे, ज्येष्ठ नेते नाना नाकाडे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, ता. अध्यक्ष विवेक बाबनवाडे, युवक काँग्रेस सचिव संजय शिंगाडे, सचिन खोब्रागडे, जिल्हा संघटक रंजीत रामटेके, अनिल साधवानी, इम्रान शेख, समीर पठाण, लतीफ शेख, संजय साळवे, शैलेश पोटवार, हंसराज लांडगे, कृपाल मेश्राम, किशोर तलमले, क्षीतीज उके, चिराग भागडकर, नजमा पठाण, वनमाला पुस्तोडे, साखरे मॅडम, सुखदेवे मॅडम, कृषीक शेख, बिट्टू सोनेकर, सोहेल पठाण आदी उपस्थित होते.