पंतप्रधान मान. नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल तेली समाजाच्या वतीने काँँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा जाहीर निषेध

69

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : देशाचे पंतप्रधान मान. नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल समस्त तेली समाजाच्या वतीने बुधवार, 21 सप्टेंबर रोजी येथील इंदिरा गांधी चौकात नारेबाजी करीत महाराष्ट्र प्रदेश काँँग्रेसचे कमिटीचे अध्यक्ष श्री. नाना पटोले यांचा जाहीर निषेध करण्यात आला. नाना पटोले हे नेहमीच स्वत:ला प्रसिद्धीत ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. आपल्यापेक्षा मोठ्या नेत्यावर कारण नसताना टीका करायची आणि स्वत:करिता प्रसिद्धी मिळवायची हा त्यांचा नेहमीचा उद्योग असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ओबीसी नसल्याचे सांगून त्यांच्या जातीवर सुद्धा वादग्रस्त वक्तव्य करून नाना पटोले यांनी विनाकारण वाद निर्माण केला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा समस्त तेली समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांची व ओबीसी समाजाची जाहीररित्या माफी मागावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

नरेंद्रजी मोदी हे गुजरात राज्यातून मोठे झाले असून ओबीसी समाजात महत्त्वपूर्ण घटक असलेल्या तेली समाजातून ते येतात. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी कधीच जाती पातीचे राजकारण केले नाही. ते फक्त विकासाचे राजकारण करतात. आज काँँग्रेस पक्षाचे सर्व मुद्दे संपलेले असून विकासाच्या मुद्यावर ते कुठल्याही प्रकारची बरोबरी मान. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सोबत करू शकत नसल्याने काँँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बिनबुडाचे नवीन मुद्दे शोधत फिरावे लागत आहे. श्री. नाना पटोले यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात नारेबाजी करीत निषेध व्यक्त करण्यात आला. नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांनी समस्त ओबीसी तसेच ओबीसी समाजात मुख्य घटक असलेल्या तेली समाजाची दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली.

निषेध आंदोलन करताना भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, भाजपा किसान आघाडीचे रमेश भुरसे, माजी जि. प. अध्यक्ष तथा भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष योगिताताई भांडेकर, माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, माजी न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, भाजयुमो जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, सागर कुमरे, विनोद देवोजवार, संजय मांडवगडे, प्रा. अरूण उराडे, नरेंद्र भांडेकर, यशवंत भुरले, देवाजी लाटकर, जनार्धन साखरे, रामन्ना बोनकुलवार, बबनराव सुर्यवंशी, बी. एम. राजनहिरे, राजू शेरकी, विलास नैताम, प्रल्हाद बडवाईक, भाजपा महिला आघाडी शहर अध्यक्ष कविताताई उरकुडे, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, माजी नगरसेविका वर्षाताई शेडमाके, रश्मी बानमारे, कोमल बारसागडे, भावना हजारे, नैताम, पायल कोडापे आदी उपस्थित होते.