– सत्यशोधक विचारवंत प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंती निमित्त भिकारमौशी येथील शेकडो माताभगिनींना वस्त्रभेट
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : सत्यशोधक विचारवंत प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात महत्वपुर्ण योगदान आहे. सामाजिक सुधारणा हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. त्यांनी ध्येयप्राप्तीसाठी कधीच कोणतीही तडजोड केली नाही. अन्याय्य रूढी, जाति-व्यवस्था आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी वक्तृत्व, लेखन व प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रे वापरून त्यांनी पुरातनमतवाद्यांशी लढा दिला.त्यांच्या आदर्श विचारांनी हिंदुहदय सम्राट मा.बाळसाहेब ठाकरे यांनी शिवसेना निर्माण केली. प्रबोधनकार ठाकरे व मा. बाळासाहेबांचा आदर्श जोपासून शिवसेनेचे जनसेवेचे कार्य सुरू असून शिवसेना लोककल्याणासाठी झटत आहे, असे प्रतिपादन शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केले. प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या समाजसेवा उपक्रमांतर्गत अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या वतीने गडचिरोली तालुक्यताील भिकारमौशी येथे माताभगिनींसाठी वस्त्रभेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाप्रसंगी शेकडो माताभगिनींना वस्त्रभेट देण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित माताभगिनींना संबोधित करताना शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार पुढे म्हणाले की, शिवसेनेला आदर्श संस्काराचा वारसा लाभला आहे. जनसेवेला केंद्रबिंदू मानून शिवसेनेची वाटचाल सुरू झाली. हिंदू हदसम्राट मा.बाळसाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांचे समाजसुधारणेत महत्वपुर्ण योगदान आहे. महिला हा समाजाचा प्रमुख घटक असून त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी पुरातन चालीरिती व अनिष्ट प्रथा, बंद होण्यासाठी प्रबोधनकारांनी पुरातनमतवाद्यांशी लढा दिला. प्रबोधनकारांचे सामाजिक कार्य महाराष्टातील जनता कधीही विसरू शकत नाही. आजच्या आधुनिक काळात समाजात मोठा बदल घडून आला असला तरी महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही प्रमाणात घडतच असतात. या घटनांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी महिलांच्या संरक्षणासाठी कठोर कायदे अंमलात येण्याची गरज आहे. शिवसेना ही जनतेच्या सेवेसाठी झटणारी सेना असून कोणतीही समस्या असल्यास ती समोर आणून द्या, शिवसेना मदतीसाठी सदैव तत्पर राहील. महिला, नागरिकांनी सुध्दा शिवसेनेच्या पाठीशी राहून जनसेवेची संधी उपलब्ध करून द्यावी आम्ही मा. बाळसाहेबांचे कट्टर शिवसैनिक जनसेवेसाठी कदापीही मागे हटणार नाही, असे शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले. शिवसेनेच्या वतीने भिकारमौशी येथे आयोजित केलेल्या वस्त्रभेट उपक्रमाची माताभगिनींनी प्रशंसा करून अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. याप्रसंगी शिवसेना सहसंपर्क अरविंदभाऊ कात्रटवार, उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे, संजय बोबाटे, नवनाथ ऊके, संदीप अलबनकर, नानाजी काळबाधे, संदीप भुरसे,राजू जवाड़े, अरुण बारापात्रे, सूरज उइके, सचिन निलेकर, निकेश लोहबरे, प्रशांत ठाकुर, राहुल सोरते, स्वप्निल खांडरे, हरबाजी दाजगाये, अतुल राऊत, मारुती ठेंगे, संदीप नरुले, मनोहर निलेकर, दयाराम नारटे, टीकाराम मेश्राम, दिवाकर गुरनुले, दिवाकर निलेकर, सुकदेव गुरनुले, राजेंद्र मेश्राम, डोमजी गुरनुले, हरिदास गुरनुले, मुकरु कुमरे, जनार्धन नरुले, भास्कर निलेकर, मधुकर गुरनुले, विश्वनाथ कुमोटी, एकनाथ मेश्राम, मेघश्याम ठाकरे, गिरिधर मेश्राम यांच्यासह गावातील नागरिक व शिवसैनिक उपस्थित होते.