अतुलभाऊ गण्यारपवार यांनी उमरी गावाला दिली अनोखी भेट ; वाचनालय उभारणीसाठी २५ हजारांंची ग्रंथभेट

101

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शेतकऱ्यांंचे कर्ते सुधारक, सामाजिक कार्यकर्ते, तथा जि. प. सदस्य मा. श्री. अतुलभाऊ गण्यारपवार यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या काही दिवसात चामोर्शी परिसरात रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, वृक्षारोपण, फळझाडे लागवड करणे, वाचनालय चळवळ सुरू असे समाजसेवी उपक्रम राबविले जात आहेत.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून काही दिवसांंपूर्वी उमरी येथे अंगणवाडी केंद्राच्या उद्घाटन निमित्ताने मा. श्री अतुलभाऊ गण्यारपवार बोलताना म्हणाले की, गाव तिथे व्यायामशाळा, गाव तिथे कृषी पंप, गाव तिथं वाचनालय असणे गरजेचे आहे. शिवाय तरुणांना रोजगार प्राप्त करण्यासाठी, स्वावलंबन वाढविण्यासाठी, समाजाला वैचारिक बळकटी देण्यासाठी गावागावात वाचनालय उभारणे ही काळाची गरज आहे, असे ते बोलत होते.
वाचनसंस्कृतीच्या खालावलेल्या दर्चाची आणि ग्रामीण जीवनाला नवीन उभारणी देण्याचा संकल्प करून सामाजिक कार्यकर्ते तथा कर्ते सुधारक मा. श्री अतुलभाऊ गण्यारपवार यांनी उमरी येथील नागरिकांनी केलेल्या वाचनालयाच्या मागणीला प्रतिसाद देत ग्रंथ भेट दिली. उमरी गावातील माजी सरपंच यादव पाटील पाल यांच्याकडे २५०००/- रुपयांंची पुस्तके भेट दिली.
असा सामाजिक कार्याचा वसा घेऊन भाऊंनी यापूर्वीही मौजा गणपूर येथे ५५ हजारांंची पुस्तके दिली होती. ग्रामसेवा हीच जनसेवा हा मा. अतुलभाऊ गण्यारपवार यांच्या कार्याचा मूलमंत्र आहे. म्हणून सामाजिक बांधिलकी जोपासणारे व्यक्तिमत्त्व असा नावलौकिक आहे.

याप्रसंगी उमरी येथील ग्रामवासियांंनी राजमाता जिजाऊ वाचनालय ३१ ऑगस्ट २०२२ ला स्थापन केले. गावच्या सरपंच श्रीमती इंदिरा बंडुजी बोरकुटे, उपसरपंच भारत निरंशहा कनाके, ग्रा. पंं. सदस्य प्रदीप अलगमकार, सुरेखा कोवे, हिवराज गेडाम यांनी वाचनालय कमिटी स्थापन केली. अध्यक्ष म्हणून यशवंत देवराव पाल तर उपाध्यक्ष म्हणून कपिल बालाजी अलगमकार, सचिव भुषण भगवान मेश्राम, ग्रंथपाल राजु बालाजी चुधरी,
उप ग्रंथपाल दुशाली सुधाकर अलगमकार, परीक्षा नियंत्रक स्वप्नील सांगळे व रॉयल मेश्राम, सदस्य म्हणून सचिन पाल, चंद्रशेखर रोहनकार, श्रीकांत रोहणे, अनिल मिसार, मुन्ना बोरकुटे, रोहिदास झाडे, सारंग मेश्राम, ईश्वर नसपुलवार यांची सर्वानुमते निवड केली. पोलिस पाटील इंद्रदास शंकर चक्कावार, तंटामुक्ती अध्यक्ष विजय बंडु पाल, माजी सरपंच यादव पाल, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामभाऊ कुबडे, सामाजिक कार्यकर्ते रंजीत लांबाडे व वामन अलगमकार व समस्त गावकऱ्यांनी मा. श्री. अतुलभाऊ गण्यारपवार यांचे मनःपूर्वक आभार मानले.