भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे व माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांनी शहरात विविध ठिकाणी गणपतीबाप्पानिमित्त सदिच्छा भेट देवून केली विधीवत पूजा

53

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : दिनांक ४ सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे दर्शन व सदिच्छा भेट या निमित्ताने भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे व माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांनी गणपती बाप्पाच्या दर्शनाला उपस्थित राहून सदिच्छा भेट देवुन गणरायाची विधिवत पूजा केली.
माजी जि. प. अध्यक्षा तथा भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. योगीताताई भांडेकर व भाजपा युवा मोर्चा जिल्हा जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, भाजप जेष्ट नेते गजाननजी यनगंधलवार, भाजपा उपाध्यक्ष अरुनजी हरडे, शंकरराव कुनघाडकर यांच्या निवासस्थानी जावून गणरायाची विधीवत पूजा करून सदिच्छा भेट दिली.
यावेळी माजी नगरसेविका वैष्णवीताई नैताम, सामाजिक कार्यकर्ते विलास नैताम, मीनाताई यनगंधलवार, श्वेताताई कुनघाडकर, जिजाबाई शंकरराव पिपरे, पुनम हेमके आदी उपस्थित होते.