जेष्ठा गौरीपूजननिमित्त माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे व भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांनी विविध ठिकाणी सदिच्छा भेट देवुन केली विधिवत पूजा

57

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जेष्ठा गौरीपुजन (महालक्ष्मी) निमित्त ४ सप्टेंबर रोजी माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे व भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी यांनी शहरातील विविध ठिकाणी सदिच्छा भेट देवून विधिवत पूजा केली.
प्रथमतः माजी नगराध्यक्ष सौ. निर्मलाताई मडके व श्री. दीपक मडके यांच्या निवासस्थानी जावुन जेष्ठा गौरीपुजन व विसर्जन कार्यक्रमात सदिच्छा भेट घेवुन विधिवत पूजा केली. यावेळी माजी नगराध्यक्ष सौ. निर्मलाताई मडके, श्री. दीपक मडके, माजी नगरसेविका वैष्णवीताई नैताम, सामाजिक कार्यकर्ते विलास नैताम, पुनम हेमके उपस्थित होते.
तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी सौ. स्मिता भारत खटी, विश्व हिंदु परिषदचे रामायणजी खटी, सौ. मनिषा रामायणजी खटी उपस्थित होते. भाजपा जिल्हा सचिव सौ. गीताताई हिंगे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेवुन विधिवत पूजा केली. यावेळी श्री. हिंगे साहेब व त्यांचेे कुटुंबीय उपस्थित होते.