गडचिरोली येथे लाईफ इन्शोरन्स एजेंटस् असोसिएशनचे पाचव्या दिवशीही देशव्यापी असहकार आंदोलन सुरूच

50

विदर्भ क्रांती न्यूज

डचिरोली : विमाधारक व अभिकर्ताधारकांच्या विविध मागण्यांसाठी लाईफ इन्शोरन्स एजेंटस् असोसिएशनने 1 सप्टेंबरपासून गडचिरोली येथे सुरू करण्यात आलेले देशव्यापी असहकार आंदोलन आज सोमवारी पाचव्या दिवशीही सुरूच होते. या आंदोलनात गडचिरोली जिल्ह्यातील विमा अभिकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

विमाधारकांचा बोनस दर वाढविण्यात यावा, विमा पॉलिसीवरील जीएसटी हटविण्यात यावी, लोन व इतर आर्थिक देवाणघेवाणमध्ये व्याजदर कमी करावा, विमाधारकांना जलदगतीने सेवा द्यावी, अभिकर्त्यांसाठी ग्रेच्युटी 20 लाख रुपये करावी, अभिकर्त्यांना पीएफ स्कीम लागू करावा, अभिकर्त्यांना वेलफेअर फंड लागू करावा, पेंशन स्कीम लागू करावी, समूह विमा योजना 20 लाख रुपये करण्यात यावी आदी विविध मागण्यांसाठी 1 सप्टेंबरपासून देशव्यापी असहकार आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आज सोमवार, 5 सप्टेंबर रोजी पाचव्या दिवशीही हे आंदोलन सुरूच असून या आंदोलनाला पाठींबा दर्शवित गडचिरोली येथील कॉम्प्लेक्स परिसरातील भारतीय जीवन विमा निगम कार्यालयासमोर गडचिरोली जिल्ह्यातील विमा अभिकर्त्यांंनी जोरदार घोषणाबाजी केेेली. यावेळी मोठ्या संख्येने विमा अभिकर्ते उपस्थित होते.