लढवय्या नेतृत्व अतुलभाऊ गण्यारपवार यांच्या वाढदिवसानिमित्त ६१ जणांनी केले रक्तदान

63

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : दिनांक ३ सप्टेंबर २०२२ रोजी महिला महाविद्यालय चामोर्शी येथे मा. श्री. अतुलभाऊ गण्यारपवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे आयोजन चामोर्शी येथील शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, डीजीलँड अँड प्रेसिडेन्सी इंग्लिश मीडियम स्कूल, स्व. जागेश्र्वर सावकार गण्यारपवार मराठी प्राथमिक विद्यालय चामोर्शी तसेच तालुका सहकारी खरेदी विक्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून एखाद्याचे प्राण वाचवण्यासाठी रक्त चढवण्याची आवश्यकता असते. अपघात, रक्तस्त्राव, प्रसवकाळ आणि ऑपरेशन ह्या स्थितींमध्ये रुग्णास अत्यधिक रक्तस्त्राव होण्याची अधिक शक्यता असते. अशावेळी रुग्णांना रक्ताची गरज पडत असते. थैलेसिमिया, ल्युकिमिया, हीमोफिलिया यासारख्या विकारांनी पीडित रुग्णांमध्ये वारंवार रक्ताची आवश्यकता पडत असते. रक्तदान हेच जीवनदान, निरोगी व्यक्तिंद्वारा केलेल्या रक्तदानाचा उपयोग गरजू रुग्णांचे जीवन वाचवण्यासाठी होतो. अशी सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन मा.श्री.अतुलभाऊ गण्यारपवार यांच्या वाढदिवस निमित्याने रक्तदान शिबिर राबविला गेला.
भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक मा. श्री. बंडूजी पा. ऐलावार यांनी केले. मा. श्री. गुरुदास पाटील चुधरी यांच्या
अध्यक्षेतेखाली व संचालक अरुण पाटील लाकडे, मा. डॉ. शेषराव भैसारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा पार पडला.

महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. व्ही. धोटे, डीजीलँड अँड प्रेसिडेन्सी इंग्लिश मीडियम स्कूलचे संचालक जे. विलास सर उपस्थित होते. रक्तदान शिबिर आयोजन वेळी महिला महाविद्यालयातील प्रा. एस.आर. काशट्टीवार मॅडम, प्रा. डॉ. एच. डी. निखाडे, प्रा. एन. आर. झाडे, प्रा.एन. डी. सावसाकडे, प्रा. के. पी. आंबोरकर, व्यवस्थापक तालुका सहकारी खरेदी विक्री संघ चामोर्शीचे राकेश पोरटे, निरीक्षक नरेश घेर, मधुकर गव्हारे, मधुकर पेदापल्लीवार,शामराव वालदे यांनी सहकार्य केले. तसेच महिला महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी श्री. सुनील आभारे, नितेश पोरटे, श्री. सौरभ सहारे, संजय गडकर, लोभेश गोर्लावार, भावना चांदेकर यांनी सहकार्य  केले.