राष्ट्रीय अधिवेशनात शेकडो राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी जाणार दिल्लीला

36

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अधिवेशन दि. ११/०९/२०२२ ला सकाळी १०.१० मी. दिल्ली येथे तालकटोरा स्टेडीयम नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रफुल भाई पटेल, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, युवक राष्ट्रीय अध्यक्ष धिरज शर्मा, युवक प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाला आमदार धर्मरावबाबा आत्राम, भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. दि. १०/०९/२०२२ ला सकाळी ०८.०० वा. दिल्लीकरिता युवक कार्यकर्ते रवाना होणार आहेत. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते युवक जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर यांच्या नेतृत्वात जाणार आहेत, अशी माहीती युवक गडचिरोली शहर अध्यक्ष अमोल कुळमेथे यांनी दिली आहे.