– वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली शहर काँग्रेस व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात 50 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
शिबिराचे उद्घाटन माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, प्रदेश महासचिव तथा माजी आम. डॉ. नामदेव उसेंडी, माजी आम. आनंदराव गेडाम, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, जि. प. माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार, शहर अध्यक्ष सतिश विधाते, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, सहकार सेल अध्यक्ष शामराव चापले, रोजगार व स्वयंरोजगार सेल शिक्षक सेल अध्यक्ष देवाजी सोनटक्के, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, प्रदेश सचिव महिला काँग्रेस भावना वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष शँकरराव सालोटकर, प्रभाकर वासेकर, सचिव सुनील चडगुलवार, रमेश चौधरी, राजेश कात्रटवार, दीपक मडके, नंदू कायरकर, कुरखेडा ता. अध्यक्ष जयंत हरडे, वडसा ता.अध्यक्ष परसराम टिकले, आरमोरी ता. अध्यक्ष मनोज वनमाळी, प्रमोद भगत, रमेश गंपावार, अतुल मल्लेलवार, प्रकाश ताकसांडे, हरबाजी मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते व पदाधीकारी उपस्थित होते.
आरोग्य तपासणीकरिता व रक्तदान शिबिराकरिता डॉ. अंजली साखरे, डॉ. इंद्रजित नागदेवते, सतिश तडकलावार, समता खोब्रागडे, प्रफुल राऊत, प्रमोदराव देशमुख, शिल्पा मेश्राम, प्रणाली ठेंगणे, श्रावन्ती कोल्लूरी, श्यामेश्वरी भांडारी, स्वप्नील चापले, कीर्ती चिताडे, उमेश शिडाम, भूषण लायबर, कुंदन गोनाडे, प्रफुल मेश्राम यांची चमू उपस्थित होती. समीर ताजने, सूरज भोयर, सीमित झाडे, सतिश ब्राम्हणवाडे, विकास रोहनकर, जयराम मडावी, विशाल कुमरे, प्रफुल बारसागडे, दिनेश मडावी, समीर मडावी, मिलिंद खोब्रागडे, खुशाल शिवणकर, रविकिरण भडांगे, गौरव येणपरेड्डीवार, वैभव बोंडे, मिथुन बाबनवाडे, रणजित पिठाले, जावेद खान, रवींद्र सहारे, कुमदेव गायकवाड, मनोज गेडाम, भारत गडकर, नेताजी गुरनुले, संजय चन्ने, देवेंद्र भोयर, मनीष लडके, अक्षय गोहणे, ज्ञानेश्वर पोरटे, पिंकू बावणे, नितीन आभारे, बापुनाथ कोहपरे सह मोठ्या संख्येने युवकांनी यावेळी रक्तदान गेले.