अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व शिक्षण मंचच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा : खासदार अशोकजी नेते

73

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या अधिसभेतील (सिनेट) पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उभे असलेले अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व शिक्षण मंचच्या उमेदवारांना आपले अमूल्य मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांनी गोंडवाना विद्यापीठातील तमाम पदवीधर उमेदवारांना जाहीर आवाहन करताना केले आहे.

दिनांक ४ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ७ वाजतापासून सायंकाळी ५ वाजतापर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू राहणार आहे. या निवडणुकीत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व शिक्षण मंचच्या वतीने खुल्या प्रवर्गातून प्रशांत रामन्ना दोंतुलवार, मनोज राजेश्वर भूपाल, सागर विनायक वाजे, यश अनिलराव बांगडे, स्वरूप सुभाष तारगे, तर राखीव प्रवर्गातून जयंत मारोतराव गौरकर, योगिता दिगांबर पेंदाम (डबले) गुरुदास मंगरुजी कामडी, धर्मेंद्र ज्ञानदेव मुनघाटे व किरण संजय गजपुरे उमेदवार असुन या सर्व उमेदवारांना आपले अमूल्य मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी गोंडवाना विद्यापीठ अधिसभेतील पदवीधर मतदारांना केले आहे.

याबाबत समस्त गोंडवाना विद्यापीठ अधिसभेतील सिनेट पदवीधर मतदार संघातील मतदार यांच्यासोबत बैठका व संपर्क सुरू करण्यात आले आहेत. समस्त पदवीधर मतदार बंधू भगिनींनी आपले अमूल्य मत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व शिक्षण मंच उमेदवार यांना द्यावे, असे जाहीर आवाहन सुद्धा खासदार अशोकजी नेते यांनी केले आहे.