बालगोपालांच्या किलबिलाटाने संताजी प्रभाग येथील क्रीडांगण दुमदुमतो !

112

– नगरसेवक आशीषभाऊ पिपरे यांच्या पुढाकाराने स्वखर्चाने विविध ठिकाणी फळरोप वृक्षलागवड कार्यक्रमांंचा शुभारंभ

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी येथील संताजी प्रभाग 3 च्या नगरसेविका सौ. सोनाली पिपरे व येथील नगरसेवक आशीषभाऊ पिपरे जिल्हा महामंत्री भाजपा ओबीसी आघाडी यांच्या पुढाकाराने आजपासून संताजी प्रभाग क्रमांक तीन येथील विविध मोकळ्या जागेत स्वखर्चाने फळझाड वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. नगरसेवक आशीषभाऊ पिपरे यांच्या पुढाकाराने आधीच येथे स्वखर्चाने सात लक्ष रुपये खर्च करून प्रभागातील बालगोपाल यांच्या खेळण्यासाठी विविध खेळांचे साहित्य लावण्यात आले आहेत. दररोज सकाळी व संध्याकाळी येथे बाल गोपाल यांच्या किलबिलाटाने संताजी प्रभाग येथील क्रीडांगण दुमदुमतो.
या क्रीडांगणावर विविध प्रभागातील लहान मुले शाळेतून आल्यावर मनसोक्तपणे सकाळी संध्यकाळी व्यायाम व विविध खेळ खेळताना दिसतात. या किलबिलाटाने नगरसेवक म्हणून आशीषभाऊ पिपरे यांच्या चेहऱ्यावर नेहमीच स्मित हास्य असते व प्रभागात प्रामुख्याने येथील महिलांना रोजगार देण्यासाठी शिवम अगरबत्ती प्रकल्प स्थापन करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून येथील शेकडो महिलांना रोजगार मिळाला आहे. याचाही वेगळं समाधान नगरसेवक आशीषभाऊ पिपरे यांना आहे. लवकरच येथे लहान बालगोपाल यांची इंग्रजी माध्यम मोफत कॉन्व्हेन्ट स्कूल सुरू करण्यात येणार आहे. तसेच प्रभागातील युवकांसाठी मोफत अभ्यासिका व वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. तसेच प्रभागात भारतीय जनता पार्टी युवा संघाच्या वतीने मोफत अंबुलेंस सेवा सुरू करण्यात येणार आहे. लवकरच गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या पुढाकाराने येथे दुर्गा उत्सव व विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. येथील मोफत वृक्ष लागवड कार्यक्रमाचे शुभारंभ आज भाजप सोशल मीडिया संयोजक रमेश अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवा नेते निखिल धोडरे, तुळसीदास नैताम, राहुलभाऊ भांडेकर, सविंद्र कोठारे, खुशाल नैताम व प्रभागातील युवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.